घरमहाराष्ट्रबदल्यांचा धडाका : राहुल महिवाल पीएमआरडीएचे आयुक्त तर, विपिन इटनकर नागपूरचे नवे...

बदल्यांचा धडाका : राहुल महिवाल पीएमआरडीएचे आयुक्त तर, विपिन इटनकर नागपूरचे नवे जिल्हाधिकारी

Subscribe

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने बदल्यांचा धडाका लावला आहे. या सरकारने आज राहुल महिवाल आणि विपिन इटनकर यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना महत्त्वाची खाती दिली जातात. तोच प्रकार शिंदे-फडणवीस सरकारने सुरू ठेवला असून या सरकारने दोन दिवसांत नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

पुणे येथील महिला आणि बालकल्याणचे आयुक्त राहुल महिवाल यांची पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेन्ट अॅथॉरिटीच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांना पुण्याच्या महिला आणि बालकल्याणच्या आयुक्त करण्यात आले आहे. एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी जयश्री भोज व शेखर सिंग यांच्यासह अन्य तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची बदली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या संचालकपदावर करण्यात आली. तर, पिंपरी-चिंचवडच्या महापालिका आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. तर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली.

हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मदन नागरगोजे यांची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. तर, सुमन चंद्रा यांची हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -