घरमहाराष्ट्रनाशिकसिडको कार्यालयाचा कायापालट; नागरिकांच्या सेवेसाठी सिद्ध

सिडको कार्यालयाचा कायापालट; नागरिकांच्या सेवेसाठी सिद्ध

Subscribe

नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या घनश्याम ठाकूर यांनी सकारात्मक भूमिका घेत वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेल्या फायलींचा आणि कामांचा निपटारा केला. उत्पन्न कमी झाल्यामुळे  बंद करण्याच्या निर्णयावर आलेल्या कार्यालयाच्या उत्पन्नाचा स्रोतही वाढला. एवढेच नाही तर आपण ज्या कार्यालयात काम करतो तेथील अंतर्बाह्य वातावरण उत्साहवर्धक असावे, त्यामुळे काम करणाऱ्यांची कार्यक्षमता देखील वाढते या हेतूने प्रशासक ठाकूर यांनी सिडकोच्या कार्यालयाचे अंतर्बाह्य रंग-रूप बदलविण्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे.

नवीन नाशिक : दिलीप कोठावदे 
चाकरमान्यांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिकमधील सिडको प्रशासनाचे कार्यालय तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (३१ जुलै २०१७) कायमस्वरूपी बंद करून येथील कारभार औरंगाबाद येथे हलविण्याचा घाट घातला गेला होता. त्यावेळी स्थानिकांसह सिडको नागरिक समितीने घेतलेल्या भूमिकेमुळे सिडको कार्यालयाच्या स्थलांतराला ब्रेक लागला. आज तीन वर्षांनंतर त्याच सिडको कार्यालयाचा कायापालट करण्याचे काम प्रगतीपथावर असून नवीन नाशिकचे सिडको कार्यालय आता कात टाकून आधुनिकतेची कास धरत नवीन नाशिककरांच्या सेवेसाठी पुन्हा सिद्ध झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासका व सिडको प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नवीन नाशिक मधील कार्यालय बंद करून औरंगाबाद येथे हलविण्याचे निश्चित झाले होते. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नवीन नाशिककरांना होणार होता. सिडकोच्या घरांचे हस्तांतरण, खरेदी-विक्री, नाहरकत दाखला, अशी छोटी मोठी कामे करण्यासाठी नागरिकांना औरंगाबादच्या खेट्या माराव्या लागल्या असत्या. संभाव्य धोका व त्यातील अडचणी वेळीच ओळखून सिडको नागरिक हक्क संरक्षण समितीने या स्थलांतराला कडाडून विरोध केला, त्याला नागरिकांसह सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळाला आणि जनआंदोलन होऊन कागदपत्रांच्या फायलींचे गठ्ठे घेऊन निघालेल्या गाड्या अडविण्यात आल्या. जनमताच्या रेट्यापुढे प्रशासन हतबल झाले आणि वरिष्ठ पातळीवर वेगवान हालचाली होऊन सिडको कार्यालयाच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली निघाला. त्यापाठोपाठ तत्कालीन प्रशासकांची बदली झाली,तर त्यांच्या जागेवर आलेल्या प्रशासकांची सेवानिवृत्ती होऊन नाशिक सिडकोचे प्रशासक म्हणून घनश्याम ठाकूर यांची नियुक्ती झाली.
प्रशासक घनश्याम ठाकूर
प्रशासक घनश्याम ठाकूर
नाशिक सिडको कार्यालयाच्या निर्मितीपासून कार्यालयाची धुरा सांभाळण्याचे काम प्रशासकांमार्फत केले जात आहे. आजतागायत सर्वच प्रशासकांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करताना आपापल्या पद्धतीने नियमांचा अर्थ काढून हा गाडा रेटण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात विकासाच्या दृष्टिकोनातून सिडकोच्या सहाही योजनांचे हस्तांतरण नाशिक महानगरपालिकेकडे झाले तसेच नाशिकमधील सिडकोच्या नवीन प्रकल्पाची योजनाही बासनात गुंडाळली गेल्याने सिडकोचा नाशिकमधील कामाचा पसारा हळूहळू कमी होत गेला. गरजेनुसार येथील कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण आले, आणि उत्पन्न कमी झाल्याचे कारण दाखवून तीन वर्षांपूर्वी ३१ जुलै २०१७ हा नाशिक सिडको कार्यालयाचा शेवटचा दिवस करण्यात आला व त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला.
याची कुणकुण सिडको नागरिक संघर्ष समितीला लागली. पुढील सर्व कामांसाठी नाशिककरांना औरंगाबाद कार्यालयावर अवलंबून रहावे लागले असते. त्यात वेळ आणि पैशांच्या अपव्ययाबरोबरच त्रास व मनस्ताप वाढणार होता. या संभाव्य धोक्यांचा विचार करून समितीने या स्थलांतराला विरोध केला. त्याला सर्वसामान्य नागरिकांनी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनीही पाठबळ दिले, आणि २१ जुलै रोजी नाशिक सिडको कार्यालयातून सर्व कागदपत्रांच्या फायलींचे गठ्ठे ट्रक भरून  रवाना करण्याच्या प्रयत्नांची माहिती समितीला कळताच सर्वांनी एकत्र येऊन कागदपत्रांच्या वाहतुकीला विरोध केला. आंदोलन झाले, आरंभी आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या प्रशासनाने नमते घेत आपला निर्णय मागे घेतला., त्यानंतर
प्रशासकांची बदली झाली. नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या घनश्याम ठाकूर यांनी सकारात्मक भूमिका घेत वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेल्या फायलींचा आणि कामांचा निपटारा केला, उत्पन्न कमी झाल्यामुळे  बंद करण्याच्या निर्णयावर आलेल्या कार्यालयाच्या उत्पन्नाचा स्रोतही वाढला. एवढेच नाही तर आपण ज्या कार्यालयात काम करतो तेथील अंतर्बाह्य वातावरण उत्साहवर्धक असावे, त्यामुळे काम करणाऱ्यांची कार्यक्षमता देखील वाढते या हेतूने प्रशासक ठाकूर यांनी सिडकोच्या कार्यालयाचे अंतर्बाह्य रंग-रूप बदलविण्यासाठी वेगाने काम सुरू केले असून काही महिन्यांपूर्वी सिडकोच्या कार्यालयात आलेली व्यक्ती आता पुन्हा कार्यालयात आला तर त्याच्या मनात आपण चुकलो तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित झाला नाही तर नवलच ठरेल.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -