घरCORONA UPDATECoronavirus: जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूकीसाठीसाठी परिवहन विभाग सज्ज

Coronavirus: जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूकीसाठीसाठी परिवहन विभाग सज्ज

Subscribe

परिवहन आयुक्त कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना तर वाहनांना स्टीकरची सुविधा

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन आहेत. नागरिकांना राज्यात कुठेही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये आणि वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून अशा वाहनांना स्टीकर देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक दारास कोणतीही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे बुधवार पासून नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

मालवाहतूक ट्रक, टेंम्पो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्ट्रीने काही निर्णय घेण्यात आले. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून अशा वाहनांना स्टीकर देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे स्टिकर वाहनाच्या समोरच्या दर्शनी भागावर चिकटवण्यात येतील. या स्टीकरचा पुरवठा संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केला जाईल. वाहतूकदाराने संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणार असल्याबाबतचा पुरावा सादर करून, प्रत्येक वाहनासाठी एक स्टीकर प्राप्त करावा लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: …म्हणून ग्रामस्थांनी गाव सोडून थाटला रानामध्ये संसार

२४ तास नियंत्रण कक्ष सुरू असणार

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीने कोणत्याही वाहतूकदारास अडचण आल्यास निवारणासाठी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे बुधवार पासून नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात येणार आहे. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वीत राहणार असून, ०२२२२६१४७२४ या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -