परिवहन मंत्री अनिल परबांवर अटकेची टांगती तलवार; ईडी कार्यालयात चौकशी सुरू

शिवसेना नेते (Shiv Sena Leader) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मागील नऊ तासांपासून अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालय (इडी)च्या कार्यालयात चौकशी (ed anil parab) सुरू आहे.

Anil Parab absence from ED inquiry lawyer will ask ED for next date
अनिल परबांची ईडी चौकशीला गैरहजेरी, वकील ईडीकडे पुढची तारीख मागणार

शिवसेना नेते (Shiv Sena Leader) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मागील नऊ तासांपासून अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालय (इडी)च्या कार्यालयात चौकशी (ed anil parab) सुरू आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी अनिल परब इडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यामुळे अनिल परब यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. (transport minister anil parab from last 9 hour ed officer stiil inquired)

मनी लॉड्रिंगचा आरोप

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayia) यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप केले होते. परबांच्या विरोधात काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळी ईडीच्या कार्यालयात हजेरी न लावता अनिल परब हे शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आपण चौकसीसाठी ईडी (ED) कार्यालयात जाऊ शकलो नव्हतो, असे परब यांनी सांगितले होते.

हेही वाचा – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर अनिल परबांचा नंबर, किरीट सोमय्यांचा इशारा

नेमके प्रकरण काय?

२०१७ मध्ये अनिल परब यांनी दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी २०२० मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकली. त्यानंतर या व्यवहारात अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. याच दरम्यान या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

कोरोना काळात मंत्री पदाचा गैरवापर

दरम्यान काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टवरुन आरोप केला होता. साई रिसॉर्ट हा अनिल परब यांचा असून त्यांनी कोरोना काळात मंत्री पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या त्यांनी केला होता. साई रिसॉर्टचे मालक अनिल परब असून त्यांनी मालमत्ता सदानंद कदम यांना विकली. त्यायानंतर सदानंद कदमांचे पत्र उघड करुन सोमय्यांनी पुरावे सुद्धा दिले.


हेही वाचा – महाराष्ट्रात सत्तास्थापनेची अशी असतील समीकरणे, ‘हे’ आहेत तीन पर्याय