‘फडणवीसांच्या आकडेवारीची सोप्या भाषेत चिरफाड करु’

'देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती पैसा दिला याची सविस्तर मांडणी करुन सांगितले, त्याला आता सरकारकडून उत्तर देण्यात येईल', असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

ED interrogated Anil Parab for 7 hours
अनिल परब यांची ७ तास चौकशी, म्हणाले यापुढेही 'ईडी'ला सहकार्य करणार

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल करुन अतिशय सोप्या भाषेत चिरफाड करुन महाराष्ट्राच्या जनतेला उद्या सरकारच्या वतीने करुन देऊ, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती पैसा दिला याची सविस्तर मांडणी करुन सांगितले, त्याला आता सरकारकडून उत्तर देण्यात येईल’, असे देखील ते पुढे म्हणाले.

फडणवीसांनी सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिले

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिले. मात्र, हे सल्ले देताना त्यांनी हा विचार करायला हवा की, महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळते असे नाही. जे सरकारमध्ये बसले आहेत त्यांना देखील अर्थशास्त्र कळतं आणि ते जाणतातही. विशेष म्हणजे सरकारने काय करावे? सरकार कसं चालते? सरकारला काय करता येते याची सर्व जाणीव सरकारला आहे. फडणवीसांनी अनेक सल्ले दिले. वेगवेगळे विषय मांडले. तसेच त्यांनी असेही दाखवले की सध्याच्या सरकार काहीही कळत नाही. जे काही कळतं ते फक्त आम्हालाच कळतं. आमच्या सल्ल्यांनी राज्य कोरोनामुक्त होईल. नाहीतर महाराष्ट्र सरकार फार मोठ्या संकटात सापडेल, असा प्रकारचे वक्तव्य केले.

अनिल परब यांचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर | Anil Parab's reply to BJP leader Devendra Fadnavis

अनिल परब यांचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर | Anil Parab's reply to BJP leader Devendra Fadnavis

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮೇ 26, 2020

‘मी फक्त एवढंच सांगू इच्छितो. महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने काम करतंय. मुख्यमंत्री अहोरात्र काम करुन तज्ज्ञांशी संवाद साधून या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. राहिला प्रश्न आज जी फडणवीसांनी आकडेवारी दिली, त्या आकडेवारीची पोलखोल आणि चिरफाड उद्या सोप्या भाषेत करुन देऊ’.


हेही वाचा- केंद्र सरकार निधी देतंय, राज्य सरकारला बोल्ड निर्णय घ्यावे लागतील-फडणवीस