घरताज्या घडामोडीधक्कादायक! दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

धक्कादायक! दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

Subscribe

दुधाच्या टँकरमधून बिअरची वाहतूक होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केलेल्या भाषणात याची घोषणा केली असून आता पुन्हा २० दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र, यामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत. मात्र, एकीकडे देशावर कोरोनासारखे मोठे संकट आले असतना दुसरीकडे एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात चक्क एका दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील कात्रज भागात हा टँकर पकडण्यात आला आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी सोमवारी रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील २९ हजार रुपयांचे बिअरचे १२ बॉक्स पकडले आहेत. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पोतील सामान जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा वगळता इतर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये, याकरता जागोजागी पोलिसांची गस्त देखील सुरु आहे. दरम्यान, सोमवारी रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी चालकाला थांबविले. चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले २९ हजार रुपयांचे १२ बिअर बॉक्स सापडल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

हेही वाचा – देशातील ‘या’ राज्याने मिळवले कोरोनावर नियंत्रण; कसे ते पहा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -