अवघ्या १२ मिनिटांत दहिसर ते मीरा रोड प्रवास, वाहतूक कोंडीच्या समस्येतून होणार सुटका

मुंबई : पश्चिम उपनगरातील मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसरपासून मीरा रोड-भाईंदर गाठणे आता फक्त १२ मिनिटांत शक्य होणार आहे. मुंबई महापालिका पूल विभाग तब्बल २,००० कोटी रुपये खर्चून लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम करणार आहे. त्यामुळे आहे. यासंदर्भातील माहिती, पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

देशाची आर्थिक राजधानीचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत दररोज बाहेरून लोंढे येत आहेत. त्यामुळे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे.त्यामुळे वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या भेडसावत आहे. विशेषतः उपनगरातून मंत्रालय, सीएसएमटी, चर्चगेट दिशेने येणाऱ्या नागरिकांना, लोकप्रतिनिधींना वाहनाने प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे.

तसेच, दहिसरपासून मीरा रोड, भाईंदर आदी ठिकाणी वाहनांने प्रवास करणेही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दहिसर ते मिरा रोड, भाईंदर मार्गे प्रवास करणे सुलभ व जलद होण्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे, या २ हजार कोटींपैकी ४०० कोटी रुपये जमीन संपादनासाठी खर्च करण्यात येणार आहेत, असे आयुक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून दहिसर ते मीरा रोड-भाईंदरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतर्फे दहिसर कांदळपाडा ते मिरारोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत ५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.


हेही वाचा : शिंदे सरकारचे 3 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर