घरमहाराष्ट्रमद्यप्राशन करून साताऱ्याच्या 'कबीर सिंग'ने केले महिलेवर उपचार!

मद्यप्राशन करून साताऱ्याच्या ‘कबीर सिंग’ने केले महिलेवर उपचार!

Subscribe

'रूग्णावर काही चुकीचे उपचार माझ्याकडून झाले तर स्वतःची मान कापून देईन'

मद्यप्राशन करणे हा एक जीवनशैलीचा भागच सध्या मानला जातो. अनेक चित्रपटातून तसे चित्रण देखील केले जात असल्याने सामान्य जीवन जगत असताना सामान्य माणसांकडून अनेकदा चित्रपटाप्रमाणे अनुकरण देखील हल्ली केल्याचे दिसून येते. काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेला कबीर सिंग हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटातील नायक डॉक्टरची भूमिका साकरत असतो. तो नशेच्या आहारी जाऊन मद्यपान केलेले असताना देखील रूग्णांवर उपचार करताना दिसतो. मात्र हे फक्त चित्रपटात घडले असे नाही तर अशीच एक घटना साताऱ्यात देखील वास्तवात घडल्याचे समोर आले आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टराने दारूच्या नशेत असताना रूग्णावर उपचार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर रूग्णावर काही चुकीचे उपचार माझ्याकडून झाले तर स्वतःची मान कापून देईन, असं या नशेत असणाऱ्या डॉक्टराने म्हटले आहे.

अशी घडला प्रकार

साताऱ्यात असणाऱ्या माण तालुक्यातील दहिवडी गावातील महिलेला साप चावल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्या महिलेला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे ठरवले. मात्र तिथे असणाऱ्या डॉक्टराने मद्य प्राशन केल्याचे समोर आले, असे असताना देखील त्याने त्या महिलेवर उपचार केले. डॉक्टर नशेत असल्याने या महिलेचे नातेवाईक घाबरले. त्यावेळी या नशेत असणाऱ्या डॉक्टराने या महिलेला काही झाल्यास माझा गळा कापून देईन असे सांगितले.

- Advertisement -

या घटनेमुळे दहिवडी परिसरील सरकारी हॉस्पिटलच्या कारभाराचा पर्दाफाश झाला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर हॉस्पिटलमधील मद्य प्राशन करून रूग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.


हेही वाचा – साताऱ्यात बापानेच केली आपल्या मुलांची गळा आवळून हत्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -