भूमाफियांनी बळाकावल्या आदिवासींच्या जमीनी; ‘यांनी’ केला गंभीर आरोप

नाशिक : अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्लीकडे भूमाफीयांनी आदिवासींच्या जमिनी बळकावून खोटे खरेदी करून स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्यावतीने लकी जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विकास परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

धुळे जिल्हयातील मौजे शिरपूर तालुक्यात बहुसंख्य जवळ जवळ 75 टक्के लोक हे आदिवासी शेतकरी व शेतमजुर असून, शिरपूर तालुक्यात 75 टक्के जमीनी अविभाज्य शर्तीच्या म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम-36 खालच्या भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी असून, सदर जमिनी ह्या धनदांडग्या लोकांनी आदिवासी जनतेच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन बनावट अंगठे घेऊन व कोणतीही पूर्व कल्पना त्यांना न देता परस्पर खरेदी करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे बर्याचशा आदिवासी लोकांना मोलमजुरी करून आपल्या उपजीविका भागवाव्या लागत आहेत.

वास्तविक पाहता भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी ह्या सक्षम अधिकारयांचे परवानगीशिवाय हस्तांतरित होत नाहीत, असे असताना कोणत्याही हस्तांतरणाच्या परवानगी न घेता परस्पर नावावर करून घेतल्या गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आदिवासींना फसविण्याच्या उददेशाने बनावट दस्ताऐवज तयार करून खोटे खरेदीखत एकमेकांनी करून घेतलेले आहेत. वास्तविक पाहता सदर जमिनी व्यतिरिक्त आदिवासींकडे दुसरी पर्यायी जमीन कसण्यासाठी नसतांना त्यांना भूमिहीन करून सदरची जमीन ही बिगर आदिवासींनी विकत घेतल्याचे बनावट दस्तावरून दिसून येते. हा व्यवहार अत्यंत बेकायदेशीर असून याची सविस्तर चौकशी करून पूर्वीचे बेकायदेशीर झालेले व्यवहार रदद करण्यात येऊन आदिवासी जमातीच्या मूळ मालकांना शेत जमीन परत करण्याचे आदेश व्हावेत. तसेच, याबाबत धुळे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, शिरपूर तहसीलदार यांना आदेश करावेत, अशी मागणी यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली

सदर जमिनी व्यतिरिक्त आदिवासींकडे दुसरी पर्यायी जमीन कसण्यासाठी नसतांना त्यांना भूमिहीन करून सदरची जमीन ही बिगर आदिवासींनी विकत घेतल्याचे बनावट दस्तावरून दिसून येते. हा व्यवहार अत्यंत बेकायदेशीर असून याची सविस्तर चौकशी करून पूर्वीचे बेकायदेशीर झालेले व्यवहार रदद करण्यात येऊन आदिवासी जमातीच्या मूळ मालकांना शेत जमीन परत करण्याचे आदेश व्हावेत तसेच याबाबत धुळे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, शिरपूर तहसीलदार यांना आदेश करावेत अशी मागणी यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष बबलू मोरे यांनी केली आहे.