घरमहाराष्ट्रशिवाजीराव पाटील यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

शिवाजीराव पाटील यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

Subscribe

शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेला नेता - सभापती

प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्‍या शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांच्या निधनामुळे शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. विधानपरिषदेत सभागृह नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माजी आमदार दिवंगत पाटील यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.

नाईक निंबाळकर म्हणाले, राज्यभर शिक्षकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करणारे पाटील हे खर्‍या अर्थाने आक्रमक नेते होते. सांगली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांशी त्यांचा संबंध होता. प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देसाई यांनी आपल्या शोकप्रस्तावात सांगितले, सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात शिवाजीराव पाटील यांनी अतुलनीय काम केले. ते सांगली विकास मंडळाचे अध्यक्ष होते. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

- Advertisement -

वित्तमंत्री जयंत पाटील म्हणाले, पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यांना लाखो शिक्षक उपस्थित असत. शिक्षकांच्या प्रश्नासाठी आग्रही असणारा नेता म्हणून त्यांचा संघर्ष प्राथमिक शिक्षक कायमस्वरुपी लक्षात ठेवतील. या शोकप्रस्तावावर सदस्य सर्वश्री सदाभाऊ खोत, विनायक मेटे, कपिल पाटील, पृथ्वीराज देशमुख, सुरेश धस आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

विधानसभेतही शोकप्रस्ताव
विधानसभेचे माजी दिवंगत सदस्य माणिकराव सबाणे व अशोक तापकीर यांना सोमवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री अजित पवार, बबनराव पाचपुते, डॉ.पंकज भोयर, अ‍ॅड. अशोक पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

तालिका सभापतींच नियुक्ती
नागपूर । विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी पाच जणांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. तालिका सभापतीपदी विधानपरिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया, प्रकाश गजभिये, रामदास आंबटकर, अनंत गाडगीळ, श्रीकांत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा सभापती नाईक निंबाळकर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -