घरमहाराष्ट्रपुणेसहलीला गेलेल्या बसचा अपघात, चालकाला डुलकी लागल्याने २४ विद्यार्थींनी जखमी

सहलीला गेलेल्या बसचा अपघात, चालकाला डुलकी लागल्याने २४ विद्यार्थींनी जखमी

Subscribe

Baramati Accident | चालकाला डुलकी लागल्याने त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे हा अपघात घडला. यामुळे २४ मुली किरकोळ आणि ३ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या बसमध्ये ४८ मुली आणि ५ कर्मचारी होते.

बारामती – सहलीला गेलेल्या खासगी क्लासच्या बसला बारामतीत अपघात झाला आहे. या अपघातात ३ मुली गंभीर जखमी झाल्या असून २४ विद्यार्थींनी किरोकोळ जखमी आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला असल्याचं वृत्त आहे.

इचलकरंजी येथील सागर क्लासेसमधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थींनीची सहल औरंगाबाद आणि शिर्डी येथे नेण्यात आली होती. औरंगाबादेत अजिंठ्या लेण्या पाहून झाल्यानंतर बस शिर्डीला गेली. शिर्डीहून ही बस पुन्हा इचलकरंजीच्या दिशेने येत होती. ही बस बारामती येथील पाहुणेवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एका चरीत शिरली. चालकाला डुलकी लागल्याने त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे हा अपघात घडला. यामुळे २४ मुली किरकोळ आणि ३ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या बसमध्ये ४८ मुली आणि ५ कर्मचारी होते.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू

गुजरातमध्येही भीषण अपघात

- Advertisement -

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात शनिवारी सकाळ-सकाळीच मोठा अपघात घडला आहे. बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस समोरून येणाऱ्या एसयुव्ही कारला जाऊन धडकली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून २८ पेक्षा अधिक जण जखमी असल्याचे वृत्त आहे. यापैकी अनेकांची परिस्थिती गंभीर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -