HomeठाणेNavi mumbai : नवी मुंबईत सिडको साकारणार त्रिपुरा भवन

Navi mumbai : नवी मुंबईत सिडको साकारणार त्रिपुरा भवन

Subscribe

नवी मुंबईतील खारघर येथे सिडकोच्या माध्यमातून त्रिपुरा भवन साकारत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी कामाची पाहणी केली. त्रिपुरा सरकार या भवनासाठी १०० कोटी मंजूर केल्याची माहिती साहा यांनी दिली. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, दिलीप ढोले, मुख्य अभियंता, एन.सी. बायस, रविंद्र मानकर, मुख्य नियोजनकार , अतिरिक्त मुख्य अभियंता, दिपक हरताळकर, अधीक्षक अभियंता, अर्जुन अनुसे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर भूखंडावर त्रिपुरा भवनचा नियोजन आराखडा बनवण्यासोबतच इमारत प्रत्यक्ष साकारण्याचे कामदेखील सिडकोतर्फे करण्यात येणार आहे. सिडको महामंडळातर्फे या प्रकल्पाच्या ‘प्रकल्प व्यवस्थापनाची’ (Project Management Committee) जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे.

नवी मुंबई, ज्ञानेश्वर जाधव

सिडकोने विविध राज्यांच्या भवनासाठी वाशी परिसरात भूखंड दिले आहेत. विशेष म्हणजे त्या भूखंडावर संबंधित राज्यांनी दिमाखात वास्तू उभारल्या आहेत. यात आणखी एका भवनाची भर पडणार आहे. निसर्गरम्य खारघरमध्ये त्रिपुरा भवन उभारण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून भूखंड देण्यात आला आहे. त्यामुळे विविध धर्म, पंथीय, १८ पगड जातीला आपल्या कुशीत घेऊन प्रत्येक राज्याला न्याय देणारे शहर अशी नवी मुंबई शहराची ओळख जगाच्या पटलावर झाली आहे.
हेही वाचा…Pawar Vs Patil : पालकमंत्रिपदावरून ‘NCP’ अन् ‘BJP’त रस्सीखेच, अजित पवार की चंद्रकांत पाटील, कोण होणार पुण्याचा ‘दादा’?
१७ मार्च १९७० रोजी सिडको अर्थात ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ’ स्थापना करण्यात आली. विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील नागरिकांना सौख्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक सुविधा देणे आणि पर्यायी शहराची निर्मिती करणे हा सिडकोचा उद्देश साध्य होताना दिसत. नवी मुंबई शहराच्या नियोजनबध्द विकासात सिडकोने पालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शहरात असणार्‍या भूखंडाचे भविष्यकालीन नागरी वापराचे नियोजन सिडकोने केले आहे. त्यामुळे मुंबईलगत विकसित झालेल्या जुळया मुंबईने म्हणजेच नवी मुंबईने इतर शहरांना मागे टाकत कात टाकली आहे.
हेही वाचा…CM Devendra Fadnavis : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेसोबत… काय म्हणाले मुख्यमंत्री?
शहरात प्रवेश केल्यानंतर वाशी खाडीकिनारी मार्गावर सिडकोच्या माध्यमातून विविध राज्यासाठी भवन उभारले आहेत. त्यामुळे बाहेरील राज्यातून वैद्यकीय उपचार, व्यवसाय, शैक्षणिक आणि शहरांना भेटी देण्यासाठी आलेल्या नागरिकांना भवन एक आधारवड ठरले आहे. इतर राज्यांप्रमाणे आता त्रिपुरा राज्यासाठी देखील सिडकोने भवन उभारण्यासाठी भूखंड दिला आहे. त्रिपुरा सरकारने महाराष्ट्रात त्रिपुराभवन उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यासाठी खारघर येथील टाटा हॉस्पिटलनजीक सेक्टर १६ येथील जमीन संपादित केली आहे. सध्या कोलकात्यात तीन, दिल्लीत दोन आणि गुवाहाटीमध्ये एक आणि चेन्नईत त्रिपुराभवन आहे.
  • त्रिपुरा सरकारचे १०० कोटी
    लोकांची, विशेषत: आजारी रुग्णांची गरज लक्षात घेऊन भवन उभारण्याचा त्रिपुरा सरकारने निर्णय घेतला. त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी गुरुवारी (ता.5) त्रिपुरा आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍यांसमवेत जमिनीची पाहणी करीत भवनाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
  • शहरात ‘या’ राज्यांचे भवन
    सिडकोने विविध राज्यांच्या सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी भूखंड दिले आहेत. नवी मुंबईत वाशी स्टेशन परिसरात उत्तरांचल, ओरिसा, आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे भवन आहेत. तर वाशीच्या सेक्टर १५ मध्ये गुजरात भवन देखील आहे. सिडकोने खारघरमध्ये मंजूर केलेले जम्मू-काश्मीर नंतर त्रिपुरा हे सिडकोचे ११ वे भवन असणार आहे.