घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांना CBIचा अजून एक दणका, TRP घोट्याळात चौकशी करणार

अनिल देशमुखांना CBIचा अजून एक दणका, TRP घोट्याळात चौकशी करणार

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने अजून दणका दिला आहे. सीबीआय अनिल देशमुख यांची टीआरपी घोटाळ्याशी संबंधित (TRP Scam) चौकशी करणार आहे. आधीच १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. त्यात अजून एका चौकशीची भर पडल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणात तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे याने ३० लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालय तपास करत आहे. चौकशीचा त्रास देऊ नये यासाठी वाझेला बार्कने लाच दिली होती. यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वाटा होता का? या ३० लाखांपैकी किती रक्कम अनिल देशमुख यांना पोहोचली? याची चौकशी सीबीआय करणार आहे.

- Advertisement -

वाझे नोव्हेंबरमध्ये टीआरपी प्रकरणाची चौकशी करत होते, तेव्हा पोलिसांच्या चौकशीचा छळ थांबवण्यासाठी बार्कने ३० लाख रुपयांची लाच दिली होती आणि बार्कने हे मान्य केलं होतं. ही लाच मुंबई बाहेर देण्यात आली. वाझेच्या टीमने ही लाच घेतली. बार्कच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे. यासंदर्भातील चौकशी सुरु असून बार्कचा हा आरोप खरा असल्याचं दिसून येत आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, हे अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून वाझे यांनी लाच घेतली का? हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सीबीआयचे १२ ठिकाणी छापे

१०० कोटी वसुली प्रकरणी बुधवारी सीबीआयने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकले. दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर मधील घरावर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -