घरमहाराष्ट्रअर्णबच्या अटकेनंतर रिपब्लिकला आणखी एक झटका

अर्णबच्या अटकेनंतर रिपब्लिकला आणखी एक झटका

Subscribe

रिपब्लिक टीव्हीच्या वितरण प्रमुख घनश्याम सिंग याला अटक

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर आता रिपब्लिक टीव्हीला आणखी एक धक्का बसला आहे. पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी या रिपब्लिक टीव्हीच्या वितरण प्रमुख घनश्याम सिंग याला अटक केली आहे. टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीशी संबंधित ही पहिलीच अटक असल्याने वाहिनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. घनश्याम याच्या अटकेने टीआरपी घोटाळ्यातील आरोपींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.

घनश्याम याला १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घनश्याम याच्या माध्यमातून आणखी एक आरोपी अभिषेक याला पैसे मिळत होते याचे पुरावे हाती लागताच मगळवारी पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. घनश्याम याला १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घनश्याम हा रिपब्लिक टीव्हीचा प्रमुख वितरक असल्याने त्याच्या अटकेमुळे रिपब्लिकच्या आणखी काही जणांना या घोटाळ्यात अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अर्णब गोस्वामी अटकेत असताना आता रिपब्लिक टीव्हीचा वितरण प्रमुख घनश्याम सिंग याला अटक केल्याने रिपब्लिकच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी अर्णब यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडत आहेत. न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना साळवे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मागील महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील एका व्यक्तीने आत्महत्या केली. यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांमुळे आपल्याला वेळेत पगार मिळाला नाही असे म्हटले होतं. त्यानंतर तुम्ही काय केले? मुख्यमंत्र्यांना अटक केली का?” असा प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे साळवे यांनी न्यायालयासमोर अर्णब आणि अन्वय यांच्यामध्ये कोणतेही खासगी संबंध नव्हते. त्यामुळेच केवळ एखाद्या कराराच्या आधारावर आत्महत्येला प्रोत्साहन दिले असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवादही केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -