भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रक उलटला; दोन जण जखमी

कार चालकाने कट मारल्याने ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. या अपघात दोन जण जखमी झाले.

Truck accident in Mumbai Bhiwandi; 2 injured
भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रक उलटला; दोन जण जखमी

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावर असणारा स्व.राजीव गांधी उड्डाण पुलावर दुपारच्या वेळी ट्रक उलटला. हा अपघात कार चालकाने कट मारल्याने ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उड्डाणपुलावरील सुरक्षा कठड्यावरच उलटला. त्यामध्ये चालक व कीन्नर हे दोघे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . या दुर्घटने नंतर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली होती.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला

भिवंडी एसटी स्थानक समोरच ही घडली घटना असून , ट्रकमध्ये धाग्याचे कोम असल्याने मारुती कार चालकाने कट मारल्यानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व त्यामध्ये हा ट्रक उलटला. परंतु सुदैवाने तो उड्डाणपुलाच्या कठड्याच्या संरक्षणामुळे ट्रक खाली कोसळला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना होतांना टळली. बसस्थानकासह रिक्षा स्टॅन्ड असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाश्यांची वर्दळ सुरूच असते . या अपघातात चालक, किन्नर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले होते. वाहतूक पोलिसांनी हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी काही काळ बंद करत ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.