Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खरा कोविड योद्धा! वडिलांचे अंत्यसंस्कार करून २४ तासातच डॉक्टर मुलगा ऑन ड्युटी

खरा कोविड योद्धा! वडिलांचे अंत्यसंस्कार करून २४ तासातच डॉक्टर मुलगा ऑन ड्युटी

भावनांपेक्षा आपल्या कर्तव्याला जास्त प्राधान्य

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राला कोरोनाने संपूर्णपणे विळखा घातला आहे. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर अहोरात्र झटत आहेत. कितीही मोठे संकट आले तरी त्याला तोंड देऊन डॉक्टरांना आपले कर्तव्य करावे लागत आहे. त्याच्यांसमोर रोज अनेक जण आपला प्राण सोडत आहे. मात्र ते काहीच करु शकत नाही. जे कोविड योद्धे आपले प्राण पणाला लावून रुग्णांची सेवा करत आहेत. त्याच्याही नातेवाईकांनी ते वाचवू शकत नाहीत. डॉक्टरांवर कितीही दु:खाचा डोंगर कोसळला तरी त्यांना त्यांची जबाबदारी झटकून चालत नाही. पुण्यातील एका डॉक्टरांवर आलेला प्रसंग सध्याच्या परिस्थितीची जाणीव करुन देत आहे.

पुण्यातील संजीवन रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ.मुकुंद पेनुरकर यांच्यानर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याचे आई, वडिल व भाऊ यांना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिल गमावल्याचे प्रचंड दु:ख असतानाही डॉ. मुकुंद यांनी आपल्या सर्व भावना बाजूला ठेवल्या. वडीलांवर अत्यसंस्कार करुन मुकुंद २४ तासाच्या आत पुन्हा त्यांच्या ड्युटीवर रुजू झाले.

- Advertisement -

गेल्या एक वर्षापासून डॉ. मुकुंद कोरोना योद्धा म्हणून सेवा देत आहेत. त्यांचे वडील नागपूरात होते. नागपूरमध्ये त्यांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने डॉ. मुकुंद यांनी त्यांना अँब्युलन्समधून पुण्यात आणले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्यांची आई व भाऊ यांच्यावर नागपूरात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. आपले कुटुंब सावरत डॉ. मुकुंद यांनी एकट्याने आपल्या वडीलांवर अत्यसंस्कार केले. त्यांच्या बहिणीला त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे वडीलांचे शेवटचे दर्शन दिले. आपल्या भावनांपेक्षा आपल्या कर्तव्याला जास्त प्राधान्य देणाऱ्या डॉ. मुकुंद यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राला १५ जिल्ह्यांत ऑक्सिजन तुटवडा, २०० MT ऑक्सिजनसाठी मुख्य सचिवांचे केंद्राला पत्र

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -