Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सत्तासंघर्षावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सत्तासंघर्षावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

मुंबई | “कायद्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्यावर सत्याचा विजय झाला आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Adv Abhishek Manu Singhvi) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली आहे. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) पक्ष प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भरत गोगावलेंची प्रतोद नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली आहे, तर विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत, या सर्व मुद्यांवर अभिषेक मनु सिंघवी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “राज्यपालांनी घेतलेले सर्वच निर्णय चुकीचे ठरविले असून विधानसभा अध्यक्षांनी देखील घेतलाला निर्णय चुकीचा आहे. विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या व्हिपला मान्यता देऊन निर्णय घेतले. परंतु, न्यायालयाने भारत गोगावलेंची प्रतोद पदाची बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतोदचा व्हीप खरा व्हीप असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळेच कायद्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्यावर सत्याचा विजय झाला आहे.”

- Advertisement -

 

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंंघर्षाचा फैसला; १४१ पानी निकालपत्र, ९ आदेश

- Advertisement -

“विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले, असे सिंघवींनी सांगितले. दरम्यान, “उद्धव ठाकरेंनी स्वत:हून मुख्यमंत्री पदाचा राजीनाम दिला, जर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे न्यायालयने त्यांना दिलासा देऊ शकत नाही”, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

- Advertisment -