घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"जिंदाल दुर्घटनेचे सत्य बाहेर आल पाहिजे"; आदित्य ठाकरेंचा सवाल

“जिंदाल दुर्घटनेचे सत्य बाहेर आल पाहिजे”; आदित्य ठाकरेंचा सवाल

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात जिंदाल कंपनी मध्ये स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. २ दिवस त्याठिकाणी आग धुमसत होती. याबाबत सत्य बाहेर येत नाहीये, अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत असे आरोप स्थानिक दुर्घटनेपासूनच करत होते. युवा सेनेचे प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे इगतपुरी तालुक्याच्या दौर्‍यावर असताना तेथील काही नागरिकांनी याबाबत त्यांना निवेदन सादर केले आहे. त्यानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी ‘या दुर्घटने बाबत जे सत्य असेल ते बाहेर आले पाहिजे’ असे म्हणत. याबाबत ‘पुढील महिन्यात पुन्हा दौरा करून हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करू’ अशीही घोषणा त्यांनी केली.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील पॉलिफिल्मची निर्मिती करणार्‍या जिंदाल कंपनीत एका प्लांटमध्ये नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी सकाळी बॉयलरच्या स्फोटाने भीषण आग लागली. त्यात दोन महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर,  १९ कामगार जखमी झाले होते. ही आग एवढी भीषण होती की, घटनास्थळापासून चार किलोमीटर दूर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्ग देखील त्यामुळे प्रभावित झाला होता. दुपारच्या सुमारास तर कंपनीच्या परिघात काळे ढग जमून संपूर्ण आकाश झाकोळून गेले होते. सुमारे शंभर फूट उंच आगीच्या ज्वाला निघत होत्या. त्यामुळे हवाई वाहतुकीलाही फटका बसला होता. ती आग दुसर्‍या दिवशी सुद्धा धुमसतच होती.

- Advertisement -

या घटनेनंतर तेथील स्थानिक नागरिकांनी मृत कामगारांची संख्या, आजूबाजूच्या परिसरातील झालेले नुकसान याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जिंदाल कंपनी प्रशासनाकडून ही त्याबाबत सुस्पष्टता देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. प्रशासनाने केलेल्या चौकशीत संशय निरर्थक असल्याची बाब समोर आली होती. मात्र, तरी स्थानिकांनी आपल्या समस्या बाबत, तसेच झालेल्या नुकसानी बाबत आपला आवाज शिथिल केलेला नाही. माजी मंत्री आदित्य ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावेळी जेव्हा इगतपुरी तालुक्यात पोहचले. तेव्हा जिंदाल कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील त्यांना निवेदन सादर करत आपल्या समस्यांची कैफियत मांडली आहे.

याबाबत बोलताना, पुढील महिन्यात पुन्हा कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात दौरा करून आढावा घेतला जाईल, हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित केला जाईल, तसेच या दुर्घटनेचे सत्य बाहेर आले पाहिजे. आणि स्थानिकांचे जे नुकसान झाले आहे त्यावर त्यांना भरपाई मिळवून देण्यात येईल. अशी घोषणा केल्याने पुन्हा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -