घरताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रातील त्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करा - जयंत पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील त्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करा – जयंत पाटील

Subscribe

नागरिकांना परत आणण्यासाठी पाऊले उचला अशी साद त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना ट्विटरद्वारे घातली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये अडकलेल्या ४५ भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी पाऊले उचला अशी साद त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना ट्विटरद्वारे घातली आहे. या नागरिकांना परत आणण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनाही पंतप्रधान कार्यालयाशी बोलण्याची विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.

करोना व्हायरसमुळे इराणमध्ये अडकलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी मंत्री जयंत पाटील यांच्याशी ट्विटर अकाऊंटद्वारे संपर्क साधला. पश्चिम महाराष्ट्रातील आम्ही जवळपास ४४ नागरिक इराणच्या तेहरान, कोम या शहरांमध्ये अडकलो आहोत. आम्हाला पुढील कोणतीही माहिती दिली जात नाही असे या नागरिकांनी ट्विटरवर म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करोनापासून बचाव व्हावा म्हणून प्यायले दारु अन्…

जयंत पाटील यांनी हे ट्विट पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना टॅग करत याबाबत माहिती दिली तसेच या नागरिकांना भारतात परत आणण्याची विनंती केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -