घर महाराष्ट्र तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! नक्की चाललंय तरी काय?

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! नक्की चाललंय तरी काय?

Subscribe

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. यावेळी मात्र तुकाराम मुंढे यांना मुख्य प्रवाहापासून बाहेर टाकलं गेलं आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नाशिक आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची मुंबईमध्ये नगरविकास खात्यामध्ये बदली झाली होती. पण, त्याचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला नव्हता. अखेर त्यांची महिन्याभरामध्ये दुसऱ्यांदा बदली करण्यात आली. एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. १२ वर्षाच्या कारकिर्दीतील तुकाराम मुंढे यांची ही तेरावी बदली आहे. यापूर्वी तुकाराम मुंढे यांची २२ नोव्हेंबर २०१८ रोजी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली मुंबईमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, नाशिकच्या महापौरपदी असताना तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय देखील रद्द करण्यात आले आहेत. नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची पुणे आणि नाशिक येथे बदली करण्यात आली. पण, त्याठिकाणी देखील त्यांना लोकप्रतिनिधींच्या रोषाचा सामना करावा लागला. पण, नाशिककर मात्र त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले.

तुकाराम मुंढे आणि बदली सत्र

२००८ साली तुकाराम मुंढे यांची नागपूर जिल्हा परिषदेवर सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळांना भेटी दिल्या. तसेच उशिरा येणाऱ्या शिक्षकांचं निलंबन देखील केलं. शिवाय, काही डॉक्टरांवर देखील कारवाई केली. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना देखील त्यांनी वाळू माफियांवर कारवाई केली. नवी मुंबईमध्ये देखील त्यांनी धडक कारवाई केली. त्यानंतर त्यांची बदली पुण्यातील पीएमपीएलच्या अध्यक्षपदी झाली. त्याठिकाणी देखील त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर पाहायाला मिळाला. अखेर सरकारनं तुकाराम मुंढे यांची बदली नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी केली. पण, नाशिकमध्ये देखील तुकाराम मुंढे आपली कारकिर्द वर्षभर देखील पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांची बदली मुंबईमध्ये झाली. आणि आता मात्र तुकाराम मुंढे यांची एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालक म्हणून पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे हे मुख्यप्रवाहातून बाहेर टाकले गेल्याची चर्चा आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -