तुम देना साथ मेरा…; पत्नीच्या निधनानंतर दहा तासांनी पतीचेही निधन, सोलापुरात गाव शोकाकूळ

solapur husband and wife death

जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा तासांतच पतीनेही प्राण सोडले आहेत. एकाच दिवसात पती-पत्नीने जीव सोडल्याने गावात शोककळा पसरली आहे. सिंधुबाई दत्तात्रय वाणी (७५), दत्तात्रय गणपत वाणी (८५) अशी या पती-पत्नीचे नाव असून ते गेले काही दिवसांपासून आजारी होते.

सिंधुबाई आणि दत्तात्रय वाणी डोंगरी गावाता वास्तव्यास होते. दोघेही गेले काही दिवसांपासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून होते. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सिंधुबाई वाणी यांचं निधन झालं. मात्र, याबाबत दत्तात्रय वाणी यांना सांगण्यात आलं नाही. मुलांच्या रडण्याच्या आवाजाने दत्तात्रय वाणी यांना काहीतरी वाईट घडल्याची कुणकुण लागली. आपल्या पत्नीचे निधन झाला असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांची वाचाच बसली. त्यांना पत्नीचा विरह सहन झाला नाही. यामुळे त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नसल्याने त्यांना आतल्या आत त्रास होऊ लागला. अखेर पहाटे तीनच्या सुमारास दत्तात्रय वाणी हेसुद्धा गतप्राण झाले.

दहा तासांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने दोघांचीही एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली. दोघांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण गावाचे डोळे पाणावले होते. सिंधुबाई आणि दत्तात्रय वाणी यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.