घरताज्या घडामोडीMumbai coastal road: प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी दरम्यान कोस्टल रोडच्या टनेलिंग...

Mumbai coastal road: प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी दरम्यान कोस्टल रोडच्या टनेलिंग काम पूर्ण, मावळा टीबीएमची पहिली मोहीम फत्ते

Subscribe

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ ह्या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज पुर्ण झाले.  या बोगदा खणन कामाचा ‘ब्रेक थ्रू’  आज गिरगाव चौपाटी येथे पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी या पहिल्या २.०७० कि.मी लांबीच्या पहिल्या बोगद्याचे काम मावळा या टीबीएमद्वारे आज पूर्णत्वाला गेले. कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, पालिकेचे अधिकारी ही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

शाब्बास, उत्तम काम करत आहात. “मावळा” या शब्दाला साजेसे काम यंत्र आणि ते यंत्र हाताळणारे माझे सहकारी करत आहेत, स्वप्नं प्रत्यक्षात आणणं कठीण असतं पण  मुंबईकरांचे हे स्वप्नं पुर्ण करण्याच्या ध्यासाने काम करणाऱ्या माझ्या टीमचा मला अभिमान वाटतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

या मावळ्याच्या कामाचा शुभारंभ केलेला दिवस आठवतो.  तेंव्हा आपण कामाचा टप्पा कधी आणि कोणत्या काळात पूर्ण करू हे सांगितले होते. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा हा प्रकल्प आहे. मुंबईच्या वाहतूकीला गती देणारा प्रकल्प. कोरोना काळात, उन वारा पावसाच्या काळातही प्रकल्पाचे काम अडले नाही, ते तितक्याच वेगाने सुरु राहिले. दोन टोक विशेषत: समुद्राखालून जोडायचे हे काम आव्हानात्मक होते.  हे काम आपण शक्य करून दाखवलं त्याबद्दल तमाम मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद, १९९५ साली मुंबईत युती शासनाने ५५ उड्डाणपूल बांधले. ते ही आता कमी पडू लागले आहेत.

- Advertisement -

नंतर आपण कोस्टल रोडचे स्वप्न पाहिले. आपण केवळ रस्त्याचे काम करत नाही तर आसपासच्या भागाचे सुशोभिकरणही करत आहोत. ठरलेल्या तारखेला सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण होईल  असा मी विश्वास देतो. शासन आवश्यक असलेले सर्व सहकार्य करेल याचे वचन देतो. मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहात तुम्हाला मी शुभेच्छा देतो  कोस्टल रोड तुमच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीतून निश्चित  कालावधी आधी पूर्ण होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

आज अतिशय आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे. कठीण काम मावळ्यांनी पार पाडले आणि पहिले टनेल पूर्ण झाले. इज ऑफ लिवींगवर फोकस करून मुंबई उपनगरात विविध कामे सुरु आहेत, मुंबईला पुढे नेण्याची ताकत या कामांमध्ये आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हमाले. बीएमसी टीमचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ऑन ग्राऊंड काम करणाऱ्या टीमलाही आदित्य ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रया – 

सुखाचा प्रवास मोकळा श्वास हे या प्रकल्पाचे ब्रीद आहे. एक वर्षात बोगदा पूर्ण झाला आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी कामास प्रारंभ झाला होता. तसेच हा एकप्रकारे विक्रम असून नियोजित तारखेपर्यंत हा बोगदा पूर्ण होईल असा विश्वास, आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया…

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ ह्या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज पुर्ण झाले.  या बोगदा खणन कामाचा ‘ब्रेक थ्रू’ आज गिरगाव चौपाटी येथे पार पडला. या कार्यक्रमात ही खरोखर इतिहास घडवणारी गोष्ट असून पक्षप्रमुखांनी पाहिलेलं स्वप्न मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण झालं असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

ही खरोखर इतिहास घडवणारी गोष्ट आहे. इतिहासामध्ये याची नोंद होणारी गोष्ट आहे. सुदैवानं ज्यावेळी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी हा सागरी किनारा प्रकल्प पक्षप्रमुख म्हणून स्वप्न पाहिलं होतं. नियतीच्या खेळीमुळे हा प्रकल्प मुख्यमंत्री झाल्यानंतरच पूर्ण झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत:ला कधीही वाटलं नव्हतं. परंतु नियतीने हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

मुंबईमध्ये इतकी छान कामं चाललेली असताना पण कुठेतरी काहीतरी घडलं तर लगेच प्रश्न उपस्थित केले जातात. अशी कामं करून दाखवा. मुंबईकरांना अशी कामं बघण्याची आवड आहे. मुंबईकरांना सतत नकारात्मक घंटा वाजवण्याची आवड नाही. आज आम्ही जी घंटा वाजवली ती आमच्या मावळ्यांनी काम करून दाखवलं. त्यामुळे काम करताना सुरूवातीची घंटा पाहीजे. नकारात्मकतेची घंटा नकोय. त्यामुळे हे स्वप्न मुंबईकरांसोबतच आदित्य ठाकरे यांचही आहे. कारण प्रत्येक वेळी कामांची दखल घेणं आणि अधिकाऱ्यांच्या कामांवर लक्ष सतत ठेवून त्यांच्याशी संवाद साधणं हे येड्या गबाळांचं काम नाही. या कामाला भारतात नाही तर जगात मान्यता दिसतेय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईसाठी बहुउद्देशीय कोस्टल रोड प्रकल्प

आशिया खंडातील व भारतातील पहिल्या ‘कोस्टल रोड’ चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सध्या या ‘कोस्टल रोड’ चे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायचे आहे. तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च असलेल्या १०.५८ किलोमीटर लांबीच्या या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे.

प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते,पार्किंग, हिरवळ आणि दोन बोगदे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, या प्रकल्पामुळे पश्चिम विभागातील हायवेवरील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागणार आहे. तसेच, प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधनाची मोठी बचत होणार आहे. पॅकेज ४ व पॅकेज १ चे कंत्राटदार मेसर्स लार्सन ऍड टुब्रो लिमिटेड आहेत. तर पॅकेज २ साठी मेसर्स एचसीसी-एचडीसी (संयुक्त उपक्रम) कंत्राटदार आहेत.


हेही वाचा : IND vs SA: केपटाऊनमध्ये खेळण्यास विराट कोहली सज्ज, कर्णधाराचं मोठ्या रेकॉर्डवर लक्ष


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -