घरमहाराष्ट्रकिशोरी पेडणेकर आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्विटर वॉर, मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टवरून जुंपली

किशोरी पेडणेकर आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्विटर वॉर, मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टवरून जुंपली

Subscribe

मिलिंद नार्वेकर यांची पोस्ट आणि त्यावर शीतल म्हात्रे व किशोरी पेडणेकर यांच्यात ट्वीटर वॉर रंगल्याने सोशल मीडियावर दोघींसाठी जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत.

मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात सातत्याने टीका करत असतात. विविध मुद्द्यांवर दोन्ही गट आगपाखड करत असतात. आज शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट रिट्वीट करत त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला माजी महापौर आणि सेनेतील उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या दोघींच्या ट्विटर वॉरची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित जाहीर करा, अन्यथा…, संजय राऊतांचा इशारा

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज एक पोस्ट ट्वीट केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. तर, बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य यामध्ये आहे. बाबरी मस्जिद पडल्यानंतर, ‘हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे,’ असं बाळासाहेब ठाकरे तेव्हा बोलले होते. त्यांचं हेच वाक्य या पोस्टमध्ये देण्यात आलं आहे.

मिलिंद नार्वेकरांनी ही पोस्ट करताच, शीतल म्हात्रे यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘अभिनंदन… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही स्फूर्तिदायक आहेतच पण ते जाहीरपणे मांडण्याची हिंमत आज शिल्लक सेनेतील मिलिंद नार्वेकरजी यांनी दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन,’ असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

- Advertisement -


त्यांच्या ट्वीटला किशोरी पेडणेकर यांनी रिप्लाय केला आहे. ‘शितले मिलिंद नार्वेकर यांनी उद्ववजी व आदित्य यांचा फोटो टाकुन tweet केले आहे. तु हे प्रत्येक गोष्टीत दखल घेऊन मी किती निष्ठावंत आहे हे दाखवले जाते आहे . हे लोकांच्या लक्षात येते आहे,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मिलिंद नार्वेकर यांची पोस्ट आणि त्यावर शीतल म्हात्रे व किशोरी पेडणेकर यांच्यात ट्वीटर वॉर रंगल्याने सोशल मीडियावर दोघींसाठी जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत.

हेही वाचा – भाजपा नेते प्रसाद लाड यांचे भारतीय लष्कर ध्वज दिनाचं ट्वीट वादात

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -