घरCORONA UPDATEसोशल मीडियावर बारावीचा निकाल जाहीर 

सोशल मीडियावर बारावीचा निकाल जाहीर 

Subscribe

वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये किती टक्के गुण मिळत असले तरी त्यांना गुणपत्रिकेसाठी मेल करण्यात यावा असा मेसेज दाखवण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे परीक्षा रद्द झाल्याने आता निकाल कधी लागतो याची वाट दहावी आणि बारावीचे विद्यार्थी पाहत आहेत. याचाच फायदा घेत बनावट वेबसाईटद्वारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये किती टक्के गुण मिळत असले तरी त्यांना गुणपत्रिकेसाठी मेल करण्यात यावा असा मेसेज दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर या वेबसाईटची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असल्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे.

दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखांबाबत अनेक अफवा सोशल मीडियामध्ये पसरत असताना आता थेट बारावीचा निकालच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल पाहण्यासाठी सोशल मीडियावर https://mahresult-nic-in-home.herokuapp.com/ ही लिंक व्हायरल झाली आहे. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले नाव, आईचे नाव आणि आसन क्रमांक टाकल्यानंतर त्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा मेसेज येतो. या मेसेजमध्ये कोविडमुळे आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने आम्हाला सर्व डेटा उपलब्ध करण्यात अडचण येत आहे. परंतु एका आठवड्यामध्ये तुमची गुणपत्रिका तुमच्या कॉलेजकडे पाठवण्यात येईल. त्यामुळे तुम्ही कॉलेजशी संपर्क साधा. तसेच तुम्ही उत्तीर्ण झाला आहात तुमचे अभिनंदन तुम्हाला अमुक टक्के गुण मिळाले आहेत. तुम्हाला गुणपत्रिका हवी असल्यास आम्हाला मेल करावा. ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. असा मेसेज त्यामध्ये देण्यात येतो.

- Advertisement -

ही वेबसाईट उच्च माध्यमिक शालान्त मंडळाच्या वेबसाईटसारखीच हुबेहूब दिसत असल्याने अनेक विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. विशेष म्हणजे या लिंकवर आपली माहिती वारंवार भरून निकाल पाहिल्यास प्रत्येकवेळी वेगवेगळे टक्के दाखवण्यात येत आहेत. या वेबसाईटमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असून अनेक विद्यार्थी या वेबसाईटला भेट देत आहेत. त्यामुळे बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याकरिता खोटी वेबसाईटसोशल मीडियावर जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने उच्च माध्यमिक शालांत मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारा हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. बनावट वेबसाईट जाहीर करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. – प्रदीप सावंत, युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य, मुंबई विद्यापीठ

निकालाचे काम वेगाने सुरु आहे. निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात येतो. त्यामुळे सोशल मीडियाकडून करण्यात येणारा प्रचार निरर्थक आहे. बनावट वेबसाईटसंदर्भात विभागीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी आम्ही राज्य मंडळाकडे पाठवल्या आहेत. – संदीप संगवे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या प्रयक्षांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. दहावी, बारावीच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉटसअप, फेसबुक व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहेत. तरी या तारखांवर पालकांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख मंडळातर्फे अधिकृत ईमेलद्वारे, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रे आणि मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
– डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य मंडळ, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या प्रयक्षांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. दहावी, बारावीच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉटसअप, फेसबुक व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहेत. तरी या तारखांवर पालकांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख मंडळातर्फे अधिकृत ईमेलद्वारे, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रे आणि मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. – डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य मंडळ, पुणे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -