घर महाराष्ट्र शिंदे सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या; सुजाता सौनिक नव्या गृह सचिव

शिंदे सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या; सुजाता सौनिक नव्या गृह सचिव

Subscribe

 

मुंबईः IAS Officer Transfer शिंदे सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या केल्या. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव पदी बदली करण्यात आली आहे. नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेले तुकराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्वरीत पदभार स्विकारावा, असे फर्मान सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

- Advertisement -

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, चंद्रकांत पुलकुंडवार, इड्जेस कुंदन, संजीव जयस्वाल, कादंबरी बलकवडे आणि मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांच्यासह २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. या अधिकाऱ्यांंना नवीन जागेवर तत्काळ रुजू व्हावे लागणार आहे.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

१) नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

२) महिला व बाल विकास विकास विभागाच्या प्रधान सचिव इड्जेस कुंदन यांची अल्पसंख्याक विकास भागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. या पदावर अनुप कुमार यादव कार्यरत होते. त्यांच्या जागमी कुंदन यांची बदली करण्यात आली आहे.

३) सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव(गृह) पदावर सैनिक यांची बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते. आता सैनिक यांच्याकडे या पदी काम करतील.

४) पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची म्हाडामध्ये बदली करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जयस्वाल हे काम करतील. अनिल डिग्गीकर हे या पदावर कार्यरत होते.

५) कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

६) एमएमआरडीएचे महागगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी म्हणून बदली करण्यात आली आहे.

७) बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची MAHADISCOM चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

८) MAHADISCOM चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे.

९) राधिका रस्तोगी यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हमून नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे.

१०) एम. एस. खाडी गाव औद्योगिक बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
अंशू सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

११) अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

१२) तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे.

१३) एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

१४) अतिरिक्त विकास आयुक्त (औद्योगिक) डॉ. माणिक गुरसल यांची महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

१५) एसबीएम(ग्रामीण) पाणी पुरवठा विभागाचे सह सचिव व प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांची रेशीम संचालक(नागपूर) म्हणून बदली करण्यात आली आहे.

१६) मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची नवी मुंबई सिडकोचे सह महाव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे.

१७) लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१८) एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशु खाद्य विभागाचे आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

१९) डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबईचे सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

२०) मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशिष शर्मा यांची नगर विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

 

 

- Advertisment -