घरताज्या घडामोडीकुर्ला इमारती दुघर्टनेतील मृतांचा आकडा 19 वर, राज्य सरकारकडून मृतांना 5 लाखांची...

कुर्ला इमारती दुघर्टनेतील मृतांचा आकडा 19 वर, राज्य सरकारकडून मृतांना 5 लाखांची आर्थिक मदत

Subscribe

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थली दाखल झाले आणि सात जणांना बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, या दुर्घटनेत २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कुर्ला, नाईक नगर सोसायटी येथील जिल्हाधिकारी यांच्या जागेवरील ४० – ५० वर्षे जुन्या धोकादायक चार इमारतींपैकी दोन इमारत (डी विंग) सोमवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेत एकूण ३२ जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित १४ जखमींपैकी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४ जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यन्त सुरूच होते. १० जखमींपैकी ९ जखमीवर नजीकच्या राजावाडी रुग्णालयात व १ जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मध्यरात्री ३ वाजता व मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. तसेच, इमारत दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

या दुर्घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, कुर्ला ( पूर्व), शिवसृष्टी रोड, एस. टी. डेपोजवळ, नाईक नगर सोसायटी येथे जिल्हाधिकारी यांच्या जागेवर ४० – ५० वर्षे जुन्या चार मजली चार खासगी इमारती आहेत. या इमारतींमध्ये बंजारा समाजाची लोक अनेक वर्षांपासून राहत होती. मात्र नंतर त्यांनी सदर इमारतीमधील खोल्या भाड्याने लोकांना दिल्या होत्या. त्यामध्ये बहुतेक कामगार लोक होते.

या इमारती जुन्या असल्याने व इमारतीचे बांधकाम हे धोकादायक स्थितीत असल्याने मुंबई महापालिकेने सदर इमारती तात्काळ खाली करण्याबाबत या इमारतींना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. तसेच, या इमारतींचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र सदर इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी इमारत काही कारणास्तव इमारती खाली केल्या नाहीत, अशी माहिती माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

- Advertisement -

सोमवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास सदर चार इमारतीपैकी दोन इमारती पत्त्यासारख्या अचानकपणे कोसळलेल्या. या दोन्ही इमारती एकमेकांना जोडलेल्या असल्याने एक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर दुसरी इमारतही कोसळली मात्र या इमारतीचे खालील दोन मजले पूर्णपणे भुईसपाट झाले व शेवटचे दोन मजले त्या खालील ढिगाऱ्यावर स्थिर राहिले.
या दोन्ही इमारती कोसळण्याच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली व आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, स्थानिकांनी अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच सदर कोसळलेल्या इमारतीच्या शेवटच्या दोन मजल्यावर अडकलेल्या काही रहिवाशांची साडीचा दोरखंड बनवून सुखरूप सुटका केल्याने ते बचावले. या घटनेत एकूण ३३ जण जखमी झाले असून त्यापैकी १९ जण मृत पावले असून उर्वरित ४ जण सायन व राजावाडी या रूग्णालयात उपचार घेत आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका यंत्रणा व अग्निशमन दल तात्काळ पोहोचले व त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मात्र घटनेची भीषणता पाहता पावसाळ्यातील दुर्घटनात मदतीसाठी अगोदरच सुसज्ज ठेवण्यात आलेल्या ‘एनडीआरएफ’ पथकाला अधिकच्या मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, २ रेस्क्यू व्हॅन, जवान, अधिकारी, ‘एनडीआरएफ’ पथक, पालिकेचे कनिष्ठ अभियंते, मुकादम, २८ कामगार, ५ जेसीबी, १ लॉरी आदींच्या साहाय्याने मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर केले.

दरम्यान राज्य सरकारकडूनही दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५ लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच, जखमींना शासकीय खर्चाने उपचार देण्यात येतील. अशी घोषणा केली आहे.

आघाडी सरकार कोसळत असताना मंत्री आदित्य ठाकरे कोसळलेल्या इमारतीच्या ठिकाणी

राज्यात सत्तेवरील महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना त्याची चिंता बाजुला ठेवून राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास इमारत दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सदर घटनेबाबत माहिती जाणून घेतली, अशी माहिती माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी दिली. प्रविणा मोरजकर या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. रात्रभर त्या घटनास्थळी उपस्थित होत्या. त्या मंगळवारी सकाळी ६ वाजता घरी परतल्या.

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे -:

(१) अनिल यादव (२१)
(२) अरविंद राजेंद्र भारती (१९)
(३)रमेश नागसी बडीया (५०)
(४) प्रल्हाद गायकवाड (६५)
(५)लिलाबाई प्रल्हाद गायकवाड (६०)
(६)अजिंक्य गायकवाड (३४)
(७) श्याम प्रजपती (१८)
(८)कुशर प्रजापती (२०)
(९)सिकंदर राजभर (२१)
(१०) अनुप राजभर (१८)
(११अनोळखी (३०)
(१२)अनोळखी (३५)
(१३) अजय भोले पासपोर (२८)
(१४)गुड्डू पासपोर (२२)
(१५) बिरजू माझी (२१)
(१६)राहुल माझी (२४)
(१७) पप्पू माझी (३५)
(१८)महेश माझी (४०)

हेही वाचा – मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून वाहनांचे नुकसान

सोमवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास सदर चार इमारतीपैकी दोन इमारती पत्त्यासारख्या अचानकपणे कोसळलेल्या. या दोन्ही इमारती एकमेकांना जोडलेल्या असल्याने एक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर दुसरी इमारतही कोसळली मात्र या इमारतीचे खालील दोन मजले पूर्णपणे भुईसपाट झाले व शेवटचे दोन मजले त्या खालील ढिगाऱ्यावर स्थिर राहिले.

साडीचा दोरखंड बनवून वाचवला जीव

या दोन्ही इमारती कोसळण्याच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली व आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, स्थानिकांनी अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच सदर कोसळलेल्या इमारतीच्या शेवटच्या दोन मजल्यावर अडकलेल्या काही रहिवाशांची साडीचा दोरखंड बनवून सुखरूप सुटका केल्याने ते बचावले. मात्र कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १० – १२ जण अडकल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली.

युद्धपातळीवर कार्य सुरू

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका यंत्रणा व अग्निशमन दल तात्काळ पोहोचले व त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मात्र घटनेची भीषणता पाहता पावसाळ्यातील दुर्घटनेत मदतीसाठी अगोदरच सुसज्ज ठेवण्यात आलेल्या ‘एनडीआरएफ’ पथकाला अधिकच्या मदतीसाठी पाचारण करण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन दल व ‘एनडीआरएफ’ पथकाने ढिगाऱ्यातून काही जखमींना बाहेर काढले असून त्यांना तत्काळ उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या राजावाडी रुग्णालयात ५ हून अधिक जखमींवर उपचार सुरू असून एका किरकोळ जखमींवर उपचार करून त्याला बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे.

मंत्री आदित्य ठाकरे कोसळलेल्या इमारतीच्या ठिकाणी

राज्यात सत्तेवरील महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना त्याची चिंता बाजुला ठेवून राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास इमारत दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सदर घटनेबाबत माहिती जाणून घेतली, अशी माहिती माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी दिली.

प्रविणा मोरजकर या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. रात्रभर त्या घटनास्थळी उपस्थित होत्या. आज सकाळी ६ वाजता त्या घरी परतल्या.

 

दुर्घटनेतील मृतांना 5 लाखांचा आर्थिक मदत जाहीर 

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार स्थानिक बंडखोर आमदाराने थेट गुवाहाटीतून मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेमध्ये सापडलेल्या सर्व कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मी देत आहे,” असं मंगेश कुडाळकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर हे या विभागाचे स्थानिक आमदार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -