घरताज्या घडामोडीरेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक

रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरु असल्याचे पुन्हा आज रात्री १० वाजता शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन समोर आले आहे. साडेपाच हजार किंमतीचे हे इंजेक्शन तब्बल ४८ हजार रुपयांना विकणार्‍या दोघांसह दोन रेमडेसिवीर इंजेक्शन अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

नाशिक शहरातील वैभव देशमुख यांच्या मित्रास रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज होती. त्यानुसार त्यांच्या मित्राने संशयितांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन पैसे देऊन ताब्यात घेण्यास देशमुख यांना सांगितले. संशयित हे फसवत असल्याचे देशमुख यांच्या लक्षात आले होते. त्यानुसार मित्राने केलेल्या कॉन्फरन्स कॉलवरुन संशयिताशी बोलत होते. देशमुखांनी संशयितांना विश्वास वाटण्यासाठी एक हजार रुपयेसुद्धा दिले होते. त्यानंतर देशमुखांनी अंबड पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरेश देशमुख यांच्याशी संपर्क केला होता. वैभव देशमुखांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयित दोघेजण कारने मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळ आले. देशमुख यांना दोघेजण रेमडेसिवीर इंजेक्शन देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -