घरताज्या घडामोडीमंत्रिमंडळ बैठकीतून काँग्रेसचे दोन्ही आमदार बाहेर, नेमकं काय आहे कारण?

मंत्रिमंडळ बैठकीतून काँग्रेसचे दोन्ही आमदार बाहेर, नेमकं काय आहे कारण?

Subscribe

राज्यात सत्तापालट होत असतानाच तीन शहरांच्या नामांतरावरून ठाकरे सरकारच्या कॅबिनेट बैठकीला सुरूवात झाली आहे. मात्र, ही बैठक सुरू असतानाच काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे बैठकीतून बाहेर पडले आहेत. परंतु ते बाहेर का पडले याबाबत अद्यापही कारण अस्पष्ट आहे.

मंत्री अनिल परब यांनी कालच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. याचबरोबर उस्मानाबादचे देखील नामांतर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारवर बहुमत चाचणीची टांगती तलवार दिसत आहे. कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वत: मंत्रिमंडळ बैठकीत हजर झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार आहे. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसेच ही ठाकरे मंत्रिमंडळाची शेवटची बैठकही ठरू शकते, असं देखील म्हटलं जात आहे. मात्र, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून हे दोन्ही काँग्रेसचे आमदार बैठकीतून बाहेर पडले का, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


हेही वाचा : तीन नामांतरावर शिवसेना ठाम, कॅबिनेटची बैठक वादळी ठरण्याची शक्यता

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -