Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी साहित्य संमेलनात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह

साहित्य संमेलनात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील घटना, दोन्हीही व्यक्ती पुण्याहून नाशिकमध्ये आलेल्या

नाशिक : नाशिकमध्ये सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही व्यक्ती हे पुण्यातून नाशिकमध्ये आलेला असून ते दोघे प्रकाशक आहेत.

या घटनेनं कुसुमाग्रज नगरी प्रांगणात एकच खळबळ उडाली. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोध महापालिकेकडून सुरू आहे. अधिक तपासणी आणि उपचारांसाठी या दोन्ही व्यक्तींना बिटको रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाणार असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. यातील एक व्यक्ती पिंपरी, तर दुसरा आळंदी येथील आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -