घरताज्या घडामोडीशिर्डीत राष्ट्रवादीचे नोव्हेंबरमध्ये 2 दिवसाचे राज्यस्तरीय शिबीर होणार; जयंत पाटलांची माहिती

शिर्डीत राष्ट्रवादीचे नोव्हेंबरमध्ये 2 दिवसाचे राज्यस्तरीय शिबीर होणार; जयंत पाटलांची माहिती

Subscribe

आगामी काळात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे बैठक पार पडली.

मुंबई : आगामी काळात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे बैठक पार पडली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माहिती दिली. (two day state level camp of NCP will be held in Shirdi in November information of Jayant Patil)

शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्रातील विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली. शिवाय, 4 व 5 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरावरही चर्चा करण्यात आली. या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. परिणामी, निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -