घरमहाराष्ट्रजळगाव: जामनेर-पहूर येथील तिहेरी अपघात २ ठार, ८ जखमी

जळगाव: जामनेर-पहूर येथील तिहेरी अपघात २ ठार, ८ जखमी

Subscribe

जामनेर-पहूर येथील रोडवर गेल्या दीड महिन्यातील अपघाताची तिसरी घटना आहे

जळगाव जिल्ह्यात असणाऱ्या जामनेर पहूर रोडवर तिहेरी भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेत या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये बाबुराव पावरा व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. जामनेर येथे असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

दीड महिन्यातील अपघाताची तिसरी घटना

जामनेर-पहूर येथील रोडवर गेल्या दीड महिन्यातील अपघाताची तिसरी घटना आहे. सदर अपघात हा सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला असल्याचे सांगण्यात येत असून आयशर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर या गाडीने समोरून येणाऱ्या रिक्षालाही जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ठार झालेल्या पावरा दांपत्य हे त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीसह दुचाकीवर होते, ती गंभीर जखमी झाली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- नाशिकमध्ये पाणी टंचाईने घेतला चिमुरड्याचा बळी

अपघातातील जखमींची नावे

रिक्षात असणारे एकूण ५ प्रवासी जखमी आहेत. यात बिलकेस चौधरी, रझाक चौधरी, रोहन चौधरी, सोहेल चौधरी, रुकसार चौधरी, सबेरा चौधरी आणि सुशील काटकर अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -