घरमहाराष्ट्रबार्शी-लातूर मार्गावर भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

बार्शी-लातूर मार्गावर भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. देगलूरकडून मुंबईकडे येडशी पांगरी मार्गे ट्रॅव्हल्स (एम एच 04 JP 771), ५ मे च्या रात्री साडेअकराच्या सुमारास पांगरीपासून दोन किलोमीटर अंतरावर खंडसरी पाटीजवळ हा अपघात घडला. समोरून चारा घेऊन जाणारा ट्रॅक्टर (MH13/AA-6918) येडशीकडे जात असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रॅव्हल्स चालक सागर विजयकुमार रेशमी (जिल्हा बिदर) आणि एक प्रवासाचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेल्या २५ प्रवाशांवर बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

लातूरची अशीच एक घटना

काल रात्री ९ च्या सुमारास लातूरमध्ये लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यांच्या अॅपे मॅजिकची समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोरदार टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक काल, रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातातून एक वर्षाची चिमुकली मॅजिकमधून बाहेर फेकली गेल्याने बचावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -