साई पालखीला ट्रकची धडक, दोन भाविक ठार

घोटी-सिन्नर हायवेवरील देवळा गावाजवळील दुर्घटना

One dies in bus accident at Malvani Mumbai

मुंबईहून शिर्डीच्या दिशेने जात असलेल्या साईपालखीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दोन भाविक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास घडली. दोघेही भाविक कांदिवलीतील रहिवाशी होते.

घोटी-सिन्नर महामार्गावर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घोटी-सिन्नर हायवेवरील देवळा गावाजवळ ही घटना घडली. मुंबईतील १८ भाविक पालखी घेऊन शिर्डीच्या दिशेने निघाले होते. शनिवार ट्रकने पालखीला धडक दिली, त्यात कांदिवलीच्या इराणी वाडी येथील राजकुमार गुप्ता आणि अलोक गुप्ता या तरुणांचा जागीच मृत्यू झाला.