मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेल्या २ मच्छिमारांचा मृत्यू

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मच्छिमार समुद्रात मासेमासीसाठी गेले.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मच्छिमार समुद्रात मासेमासीसाठी गेले. परंतु, समुद्र खवळला असल्याने या दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला. गोपाळ मडवे आणि वसंत राऊत अशी मृत मच्छिमारांची नावे आहेत. (two fishermen dead in sea due to fishing in heavy rains)

पालघर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे या दोघांचे मृतदेह समुद्रकिनारी आढळून आले. हे दोघेही डहाणूतील बहाड इथले रहिवासी होते. पालघरमध्ये गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच पश्चिम किनारपट्टी भागात वादळीच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असल्याने समुद्रही खवळला होता.

डहाणू तालुक्यातील बहाड इथले दोघे जण ११ जुलै मच्छी पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. मात्र दोघेही घरी परत न असल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. अखेर पहाटे म्हणजे १२ तासानंतर या दोन्ही मच्छिमारांचे मृतदेह समुद्रकिनारी आढळून आले आहेत.

पालघरमध्ये रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु होता. याच वादळाच्या तडाख्यात आल्याने दोन्ही मच्छिमारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जोरदार पाऊस, त्यात समुद्र खवळलेला, अशा वातावरणात निसर्गाला आव्हान देत हे मच्छिमार मासे पकडण्यासाठी गेले आणि त्यांनी जीव गमावला.

मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला असून त्या दुथडी भरुन वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून ही पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर, संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी योजना राबवण्याचा निर्णय