घरCORONA UPDATEबाथरूमच्या खिडकीचे गज तोडून दोन केैद्यांचे येरवडा जेलमधून पलायन!

बाथरूमच्या खिडकीचे गज तोडून दोन केैद्यांचे येरवडा जेलमधून पलायन!

Subscribe

येरवडा कारागृहाजवळ उभारण्यात आलेल्या ताप्तुरत्या कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केलं आहे. शनिवारी पहाटे हे कैदी पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाथरूमच्या खिडकीचे गज तोडून हे दोघे पळाले. सध्या या पळालेल्या कैद्यांच्या शोध सुरू आहे.

हर्षद सय्यद व आकाश बाबूलाल पवार अशी कारागृहातून पसार झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून,  त्यांच्यावर चोरी, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या काळाच येरवडा येथे शासकीय वसतिगृहात तात्पुरते कारागृह तयार केले आहे. या ठिकाणी कैदी ठेवण्यात येत आहेत. त्या ठिकणी असलेल्या कैद्यांपैकी दोन कैद्यांनी बाथरूमचे गज तोडून पळाले. पहाटेच्या सुमारास बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघांनीही पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कैद्यांचा शोध सुरू केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी देखील बाळासाहेब गोविंद कांबळे या कैद्याने पलायनाचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत बंदोबस्तावरील पोलिसानं त्याला पकडलं होते.


हे ही वाचा – खुशखबर! सोनं स्वस्त झालं, आजचा मुंबईतील भाव ‘इथे’ वाचा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -