घरताज्या घडामोडीज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेरांना फासले काळे

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेरांना फासले काळे

Subscribe

साहित्य संमेलनातील प्रकार, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत पुस्तकाचा केला निषेध

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आलेले ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक गिरीष कुबेर यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. कुबेर यांनी राजे संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला असलेल्या पुस्तकावरुन आक्षेप घेतलाय. याच कारणावरुन हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. संमेलनाच्या समारोप सोहळ्यासाठी कुबेर संमेलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर ते बॅटरीच्या वाहनातून स्टॉल्स पाहण्यासाठी निघाले होते. याचवेळी अचानक आलेल्या दोन तरुणांनी संभाजी महाराजांचा जयघोष करत कुबेर यांना काळं फासलं. काही समजण्याच्या आत संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे पोलिसांचाही गोंधळ उडाला. ‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातल्या वादग्रस्त मजकुरात संभाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह लिखाणावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने हे पुस्तक मागे घेण्याची मागणी केलीय. याच कारणावरुन हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -