घरक्राइमव्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावणे सहा कोटींची...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावणे सहा कोटींची किंमत

Subscribe

अत्यंत महाग असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन जणांना सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अत्यंत महाग असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन जणांना सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अत्तर निर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जातो असे सांगितले जाते. त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पावणे सहा कोटी रुपये किंमत आहे.

सांगलीमधील शामराव नगर जवळील एपीजे अब्दुल कॉलेज जवळून या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केलीय. वेल माशाच्या उलटीची अवैधपणे विक्री केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे. त्याला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळते. व्हेल माशाची उलटीची तस्करी करण्यासाठी काही व्यक्ती एपीजे अब्दुल कॉलेज येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

- Advertisement -

त्यानुसार सापळा रचून या ठिकाणी दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसून येत होती. या दोघात संशयितांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता,त्यांच्याजवळ व्हेल माशाची पावणे सहा किलो वजनाची उलटी आढळून आली. चौकशी केल्यानंतर त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.

सिंधुदुर्गातील समुद्रात सापडली व्हेल माशाची उलटी घेऊन ती विकण्यासाठी अकबर शेख हा सांगलीत आला होता. सांगलीत राहणाऱ्या सलीम पटेल हा ती उलटी विकत घेण्यासाठी आला होता. या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या घटनेची माहिती दिली. तसेच सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

एखाद्या प्राण्याच्या उलटीला इतकी किंमत का मिळते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.

व्हेल माशाच्या उलटीला शास्त्रीय भाषेत एम्बरग्रीस म्हणतात. व्हेलच्या आतड्यांमधून एम्बरग्रीस बाहेर पडतं. व्हेल मासा समुद्रात अनेक प्रकारचं अन्न खातो. काहीवेळा त्याला एखाद्या प्रकारचं अन्न पचत नाही, तेव्हा तो उलटी करतो. त्यालाच एम्बरग्रीस म्हटलं जातं. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे व्हेलची उलटी चिकट बनते. ती मेणासारखी दिसते. तिचं वजन १५ ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असू शकतं. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या उलटीला दुर्गंधी येते. मात्र या उलटीचा वापर परफ्युम तयार करताना होतो. परफ्युमची निर्मिती करणाऱ्या कंपन्या उलटीचा वापर करतात. परफ्युम शरीराला लावण्यासाठी उलटीतील घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. याचमुळे परफ्युम दीर्घकाळ टिकतात. परफ्युम तयार करणाऱ्या कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी प्रचंड रक्कम मोजतात. व्हेलच्या उलटीचा वापर सुगंधित धूप आणि अगरबत्तीमध्येही होतो. एम्बरग्रिसचा तुकडा सोबत ठेवल्यास प्लेग रोखण्यात मदत होते असं युरोपियन लोक मानतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -