Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र वीज पडून खेळाडूंचा मैदानातच मृत्यू, नागपूरातील दुर्दैवी घटना

वीज पडून खेळाडूंचा मैदानातच मृत्यू, नागपूरातील दुर्दैवी घटना

चणकापूर मैदानावरील दुर्घटना, एका जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

Related Story

- Advertisement -

खापरखेडाच्या चनकापूर मैदानावर सरावासाठी गेल्लाय दोन खेळाडूंचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. हे दोघेही खेळाडू सावरनेरमधल्या चनकापूर कॉलनीत राहत होते. अनुज कुशवाह (वय ३२) आणि तन्मय दहीकर (वय १२) अशी मृतांची नावं आहेत. सुनील थोडी गोठीफोडे अशं जखमीचं नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात पाठवलं जाईल.

नियमित सरावासाठी खेळाडू या मैदानावर येत असतात. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाले. असे असतानाही काही खेळाडू सराव करत होते. पावसाला सुरुवात होताच काही खेळाडूंनी शेडकडे धाव घेतली. मात्र, अनुज आणि तन्मय मैदानातच होते. काही समजण्यापूर्वीच अचानक अनुज आणि सक्षम यांच्या अंगदावर वीज कोसळली

- Advertisement -