कोरेगाव भीमाप्रकरणी विश्वास नांगरे पाटलांसह दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Corona Virus vishwas nangre patil corona positive including 18 senior officers 4 Additional Commissioner of Police

Bheema Koregaon Case | पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी स्थापन झालेल्या चौकशी आयोगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांना नोटीस पाठवम्यात आली आहे. यानुसार, त्यांची २१ ते २५ जानेवारीदरम्यान चौकशी होणार आहे. चौकशी करून त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. यावेळी विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक होते. तर, सुवेझ हक पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक होते. तर, शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त होते. त्यामुळे या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणातील हर्षाली पोतदार हिचीसुद्धा आयोगासमोर चौकशी होणार आहे.

हेही वाचा – bhima koregaon : कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा, अजित पवारांकडून जयस्तंभास अभिवादन

सह्याद्री अतिथीगृहात २१ ते २५ जानेवारी दरम्यान विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा येथे त्यादिवशी नेमकं काय झालं होतं, याबाबत सखोल माहिती घेण्यात येणार आहे. २१ आणि २२ जानेवारी रोजी हर्षाली पोतदार हिची चौकशी होणार आहे. २१ ते २३ जानेवारी रोजी डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. तर २४ ते २५ जानेवारी आणि सुवेझ हक यांची २४ ते २५ जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.

हेही वाचा – Bhima koregaon case : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने परमबीर सिंह, रश्मी शुक्ला यांना बजावला समन्स

आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असे स्पष्ट करत या जामीनाविरोधात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा – कोरेगाव भीमा प्रकरण : तेलतुंबडेंना दिलेला जामीन योग्य – सर्वोच्च न्यायालय