नंदुरबारमध्ये दोन दुकानांना भीषण आग!

नंदुरबार शहरातील राजपाईप एजंसी तसेच हार्डवेअरच्या एका दुकानाला ही आग लागली आहे. रात्री दोनच्या सुमारास ही आग लागली असून ही आग मोठी असल्याने शहरातून आग विझवण्यासाठी मदत मागण्यात आली होती.

Two shops were fire in Nandurbar

नंदुरबारमध्ये शहादा शहरातील दोन दुकानांना भीषण आग लागली आहे. दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबार शहरातील राजपाईप एजंसी तसेच हार्डवेअरच्या एका दुकानाला ही आग लागली आहे. रात्री दोनच्या सुमारास ही आग लागली असून ही आग मोठी असल्याने शहरातून आग विझवण्यासाठी मदत मागण्यात आली होती. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन्ही दुकानांना लागलेल्या आगीमुळे दुकानांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.