घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गातील अनधिकृत पर्सेसिन मासेमारीवर बसणार चाप, दोन स्पीड बोटी देण्याचे आश्वासन

सिंधुदुर्गातील अनधिकृत पर्सेसिन मासेमारीवर बसणार चाप, दोन स्पीड बोटी देण्याचे आश्वासन

Subscribe

Maharashtra Winter Session 2022 | पर्सेसीन मासेमारीवर बंदी असतनाही अनेक मच्छिमार बेकायदा मासेमारी करत आहेत. एकच गस्ती नौका असल्याने पर्सेसीन मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करता येत नाहीत. तसेच, या गस्ती नौकांचा वेगही कमी असल्याने कारवाई करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अश्ववेग असणाऱ्या स्पीडबोट सिंधुदुर्गाला मिळाव्यात अशी मागणी वैभव नाईक यांनी केली होती.

Maharashtra Winter Session 2022 | नागपूर – सिंधुदुर्ग किनारपट्टीलगत केवळ एकच गस्ती नौका असल्याने या जलक्षेत्रात मोठ्याप्रमाणात अनधिकृत पर्सेसिन मासेमारी (Purse Seined Fishing) केली जाते. तसंच, या गस्तीनौकेचा वेगही मर्यादित असल्याने अनधिकृत मासेमारीवर चाप लावता येत नाही. त्यामुळे पर्सेसिन मासेमारी वाढल्याने समुद्रातील अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. यावर अंकुश ठेवण्याकरता दोन स्पीड बोटी देण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

हेही वाचा – ‘नैना’तील इमारतींच्या पुनर्विकासासाठी एफएसआय वाढवणार, उदय सामंत यांची मोठी घोषणा

- Advertisement -

पर्सेसीन मासेमारीवर बंदी असतनाही अनेक मच्छिमार बेकायदा मासेमारी करत आहेत. एकच गस्ती नौका असल्याने पर्सेसीन मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करता येत नाहीत. तसेच, या गस्ती नौकांचा वेगही कमी असल्याने कारवाई करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अश्ववेग असणाऱ्या स्पीडबोट सिंधुदुर्गाला मिळाव्यात अशी मागणी वैभव नाईक यांनी केली होती.


गस्ती नौकांची संख्या कमी आहे, हे खरं आहे. जिल्हानिहाय विचार केल्यास ७२० किमीच्या किनाऱ्यावर सात जिल्हे येतात. पण आपल्याकडे पाचच जिल्ह्यांमध्ये या बोटी आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन दोन स्पीड बोटी देण्यात येतील, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसंच, पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या आड कोणी येत असेल तर शासन पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठिशी असेल, असं आश्वासनही मुनगंटीवारांनी दिलं.

- Advertisement -

सिंधुदुर्गात केवळ ३० ते ४० टक्केच डिझेल परतावा मिळत असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांनी केली होती. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, गेल्या सात वर्षांत मिळाला नसेल तेवढा डिझेल परतावा दिला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -