घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह खंडणी प्रकरण : निलंबित पोलीस निरीक्षक गोपाळ आणि आशा कोरके...

परमबीर सिंह खंडणी प्रकरण : निलंबित पोलीस निरीक्षक गोपाळ आणि आशा कोरके पुन्हा सेवेत रुजू

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. खंडणी प्रकरणातील अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा या दोघांना सेवेत सामाविष्ट करण्यात आले आहे. (Two Suspended Police Officers Reinstated Param Bir Singh Extortion Case)

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर 10 महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले.

- Advertisement -

खंडणी प्रकरणी व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांच्यासह सात जणांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर खंडणीच्या गुह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना अटक केली होती. या अटकेनंतर किल्ला न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गोपाळेंना आर्थररोड तर कोरकेना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार? दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -