घरCORONA UPDATEराज्यात दोन हजार सक्रीय कोरोना रुग्ण, दोन जिल्हे बनले कोरोनामुक्त

राज्यात दोन हजार सक्रीय कोरोना रुग्ण, दोन जिल्हे बनले कोरोनामुक्त

Subscribe

मुंबई – गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४८० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी ३३६ नवे रुग्ण सापडले होते. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारच्या संख्येत १०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. तर, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८९.१५ टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ५२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत ७९,७३,६७५ कोरोना रुग्णांवर कोरोनावर मात केली आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या राज्यात ८१ लाख २४ हजार २९९ एवढी झाली आहे. तर, यापैकी २ हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यात दोन कोरोना रुग्णांचा मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात १.८२ टक्के मृत्यूदर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल; मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

सक्रीय रुग्ण किती?

- Advertisement -
  • मुंबई ७९२
  • पुणे ५४२
  • ठाणे २९५
  • नागपूर १०७

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर, धुळे आणि परभणी हे कोरोनारुग्ण जिल्हे बनले आहेत. तसंच, सिंधुदुर्ग, सांगली, जळगाव,  नंदुरबार, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये दहापेक्षा कमी सक्रिय रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा – रात्री आठ वाजलेले…,अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्री शिंदेंची तळमळ

आज किती रुग्ण सापडले?

  • मुंबई १३०
  • पुणे २४
  • पुणे मनपा ५६
  • पिपंरी चिंचवड ४९
  • नवी मुंबई ३८

उल्हासनगर, भिवंडी मनपा, मालेगाव, धुळे, धुळे मनपा, जलगाव, जलघाव मनपा, सोलापूर मनपा, सांगली मनपा, सांगली, हिंगोली, परभणी, परभणी मनपा, बीड, यवतमाळ, बुलढाणा आणि गडचिरोली या ठिकाणी आज एकही कोरोना रुग्ण आढळळा नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -