मुंबईत ‘बंडखोरां’च्या सुरक्षेसाठी केंद्राच्या २ हजार जवानांचा फौजफाटा

CRPF team deployed outside at house of 15 rebel MLAs from Shinde group
शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात

शिवसेनेचे बंडखोर आमदार (shiv sena rebel mla) आज आसामच्या गुवाहटीतील रेडिसन्स ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमधून गोवाला रवाना झाले आहे. उद्या हे सर्व बंडखोर आमदार मुंबईत (Mumbai) दाखल होणार आहेत. मात्र, या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने (Central Government) सीआरपीएफच्या (CRPF) तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. (two thousand crpf jawan deployed in mumbai for security of shiv sena rebel mlas)

राज्यपालांनी गुरुवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या बहुमताच्या चाचणीसाठी बंडखोर आमदार मुंबईमध्ये पोहोचणार असून त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – आधी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना वंदन मगच अविश्वास ठरावावर मतदान…बंडखोरांच ठरलं

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदरांनी बंड पुकारल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेत त्यांचा विरोध केला. तसेच, अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे हे आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचे काय असा सवाल विचारण्यात आल होता. याच पार्श्वभूमीवर सीआरपीएफचे २ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.

या बंडखोर आमदारांना विमानतळापासून ते विधानसभेपर्यंत नेण्याची जबाबदारी ही या जवानांवर आहे. शिवाय, शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा बजावल्या असून कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये असा आदेश दिला आहे.

हेही वाचा – पुणेकरांसाठी पोलीस सज्ज, ११२ हेल्पलाईन क्रमांकासाठी मॉडर्न कंट्रोल रुम

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेत. राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून शिंदे गटातील आमदारांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. तसेच आमदारांच्या घराबाहेर सुद्धा निदर्शने करण्यात येत आहे. यामुळे आमदारांनी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर केंद्राकडून आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. सीआरपीएफच्या जवानांची टीम आमदारांच्या घराबाहेर पाठवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामांतर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय