घरठाणेमानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील दुचाकी वाहनांना आग

मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील दुचाकी वाहनांना आग

Subscribe

पनवेल – हार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आगीच्या भक्ष स्थानी पडल्या आहेत. सवापाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले असून, अगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आगीत किती दुचाकीनच नुकसान झालेय याची माहिती अद्याप हाती लागली नसून, चार ते पाच दुचाकीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.स्थानक परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरु असल्याने स्थानक परिसरातील वाहन तळ बंद असल्याने हार्बर मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने परिसरातील मोकळ्या मैदानाचा वापर वाहन उभी करण्यासाठी करावा लागतो. आगीची झळ पोहचलेल्या दुचाकी रेल्वे प्रवाशांच्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २४ तासांसाठी ‘या’ भागात पाणीकपात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -