घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरधावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे कापले हात, बुलढाणा-मलकापूर आगारातील घटना

धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे कापले हात, बुलढाणा-मलकापूर आगारातील घटना

Subscribe

बुलढाणा – जिल्ह्यात आज एक धक्कादायक घटना घडली. धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्रामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करमाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले. या घटनेत दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगावमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळी साहेपाच ते सहाच्या सुमारास मलकापूर-पिपळगाव देवी मार्गावर ही घटना घडली. यावेळी काही तरुन रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात होती. यावेळी बसच्या चालक केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहे आलेला होता. त्यामुळे व्यायाम कराणार्या तरुणांना या प्रत्र्याचा धक्का लागला. यामुळे दोन्ही तरुणांचे हात कामपले गेले. विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे या दोन्ही तरुणांची नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले –

मलकापूर आगारातील बस पहाटे साडेपाचच्या सूमारास मलकापूरहून पिंपळगावदेवी कडे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी पिंपळगावदेवी आणि मलकापूर दरम्यान काही तरुण हे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. हे तरुण रोज या ठिकाणी व्यायाम करतात. हे तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते, असे कळाले आहे. याचवेळी संबंधित एसटी भरधाव वेगाने इथून जात असताना बसचा धक्का मुलांना लागला. यात दोन मुलांचे हात कापले गेले. हात नुसते कापले नाहीतर तर तुटून जवळपास 50 ते 60 फूट अंतरावर जाऊन पडले. यावेळी चालकाने बस थोडा वेळ थांबवली, पाहिले आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून गेला. या जखमी मुलांना तिथेच सोडून चालक निघून गेला. ही घटना जवळच्या गावातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी या दोन्ही तरुणांना मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

- Advertisement -

संतप्त रहिवाशांनी आगार व्यवस्थापकाला विचारला सवाल –

संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी विचाराला. खरंत एखादी एसटी बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी केली जाते. काही त्रुटी वगैरे नाही हे पाहिले जाते. मात्र, संबंधित बसचा पत्रा बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर पडली आणि पुढील दुर्घटना घडली. जवळपास 200 जणांचा जमाव इथे होता. परिणामी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -