55 लाखांचे 5 लाख हा टायपिंग एरर, नवाब मलिक प्रकरणात ईडीची गंभीर चूक उघड

दुसरीकडे नवाब मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यावर 7 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण याचदरम्यान झालेल्या सुनावणीत नवाब मलिकांनी 55 लाख हसिना पारकरला दिल्याचे ईडीने म्हटले होते. ईडीने न्यायालयात त्यांची चूक कबूल केली असून, मलिकांनी 5 लाख दिल्याचे म्हटले आहे. आमच्याकडून टायपिंगमध्ये मिस्टेक झाल्याचं ईडीने सांगितलंय.

PMLA court allows Nawab Malik to get treated at a private hospital
नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी

मुंबईः विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत (ED Custody) 7 मार्चपर्यंत वाढ केलीय. दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणात (Dawood Ibrahim Money Laundering Case) नवाब मलिकची कोठडी आज संपत असल्यानं विशेष न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावली. दुसरीकडे नवाब मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यावर 7 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण याचदरम्यान झालेल्या सुनावणीत नवाब मलिकांनी 55 लाख हसिना पारकरला दिल्याचे ईडीने म्हटले होते. ईडीने न्यायालयात त्यांची चूक कबूल केली असून, मलिकांनी 5 लाख दिल्याचे म्हटले आहे. आमच्याकडून टायपिंगमध्ये मिस्टेक झाल्याचं ईडीने सांगितलंय.

तो व्यवहारच कधी झालेला नव्हता

विशेष म्हणजे या सुनावणीत सहभागी असलेले वकील अॅड. निलेश भोसले यांनीसुद्धा महत्त्वाची माहिती दिलीय. नवाब मलिकांच्या बाजूनं कोर्टात बाजू मांडण्याचे काम अॅड. अमित देसाई यांनी केलं. नवाब मलिकांची बाजू मांडत असताना त्यांनी काही गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या. मागच्या रिमांड कॉपी आणि आजच्या रिमांड कॉपीमध्ये फारसा बदल नाही. मागच्या रिमांड कॉपीमध्ये जो 55 लाख रुपयांचा व्यवहार नवाब मलिकांच्या कंपनीत आणि हसिना पारकरच्या कंपनीबरोबर झालेला होता. तो कधी व्यवहारच झालेला नव्हता, तो फक्त 5 लाख रुपयांचा व्यवहार आहे, असं ईडीचं म्हणणं आहे.

टायपिंग मिस्टेक म्हणजेच टायपोलॉजिकल एरर

55 लाख आणि 5 लाखांमध्ये टायपिंग मिस्टेक म्हणजेच टायपॉलॉजिकल एरर शब्द वापरलाय, ती टायपिंग मिस्टेक झाली, असं कळवलं. त्याच बरोबर समोरच्या वतीनं ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यात नवाब मलिक रुग्णालयात असल्याचं सांगण्यात आलं. रुग्णालयात असल्यानं त्यांची काही चौकशी करणं बाकी आहे. म्हणून त्यांनी कोठडीची मागणी केलीय. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं 7 मार्च 2022 पर्यंत नवाब मलिकांनी कोठडी वाढवली, असंही अॅड. निलेश भोसले यांनी सांगितलं.

हा राजकीय सूडबुद्धीनं केलेला प्रकार

ईडीकडून 55 लाखांचे 5 लाख किंवा 5 लाखांचे 55 लाख होणं आणि एका महाराष्ट्राच्या मंत्र्याला आत टाकणे हे एरर नसून हा राजकीय सूडबुद्धीनं केलेला प्रकार आहे. या कायदेशीर लढाईत कायदेशीर बाबी सर्व तपासून सत्र किंवा उच्च न्यायालयात ते आपली बाजू मांडतील, असंही वकील अॅड. निलेश भोसले यांनी सांगितलंय.


हेही वाचाः Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना मोठा धक्का, ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ