घरताज्या घडामोडीU-19 world cup, IND vs SA: भारताची नजर आता ५ व्या अंडर...

U-19 world cup, IND vs SA: भारताची नजर आता ५ व्या अंडर १९ विश्वचषक विजेतेपदावर

Subscribe

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हरफनमौला राज बावा आणि खब्बू फलंदाज आहे. जो संघासाठी उपयोगी खेळाडू आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर म्हणाले की, या स्पर्धेत भारताचा अभिमानास्पद इतिहास आहे.

चार वेळा चॅम्पियन असलेला भारतीय संघ शनिवारी अंडर-१९ विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात भारताचे सर्वोत्कृष्ट विक्रम कायम ठेवत नवीन रिकॉर्ड करण्यावर लक्ष असेल. हरनूर सिंह, राजवर्धन हंगरगेकर, कर्णधार यश धुल आणि रवी कुमार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय संघ एशिया कप जिंकल्यानंतर इथे पोहचली आहे. सराव सामन्यात संघाने वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारतीय टीमने मागील ३ हंगामात अंतिम फेरीत धडक दिली आहे. भारतीय संघाचा दोन वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध अंतिम फेरीत पराभव झाला होता. त्यावेळी असलेल्या खेळाडूंची अद्याप वरिष्ठ संघात दाखल झाला नाही. आता २०२२ च्या अंडर १९ संघात काय चमत्कार घडतोय हे पाहायला मिळणार आहे. तसेच संध्याच्या संघात पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल सारख्या खेळाडूंचा अभाव आहे. परंतु इतर खेळाडूंनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

संघाचा डावखुरा सलामीवीर हरनूर सिंगकडून संघासाठी खूप अपेक्षा आहे. कारण मागील वेळी हरनूर सिंगने खूप धावा केल्या आहेत. एशिया चषक स्पर्धेत हरनूरने ५ सामन्यांमध्ये २५१ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ जानेवारी झालेल्या सराव सामन्यात नाबाद १०० धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज हंगरगेकर महाराष्ट्रासाठी वरिष्ठ संघाकडून क्रिकेट खेळला आहे. एशिया कपमध्ये त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने छाप पाडत ८ गडी बाद केले होते. डावखुरा गोलंदाज रवि कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ विकेट घेतले होते. कर्णधार धुल दिल्ली क्रिकेटमध्ये प्रतिभावान फलंदाज म्हणून नावाजला जातो. एशिया कपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नाही परंतु दोन्ही सराव सामन्यात अर्धशतक केले आहे.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हरफनमौला राज बावा आणि खब्बू फलंदाज आहे. जो संघासाठी उपयोगी खेळाडू आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर म्हणाले की, या स्पर्धेत भारताचा अभिमानास्पद इतिहास आहे. परंतु ती भूतकाळातील गोष्ट आहे. आम्हाला नवीन संघासह सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल.” भारताला दक्षिण आफ्रिका , आयर्लंड आणि युगांडा यांच्यासह ब गटात स्थान देण्यात आले आहे . अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा या गटातील सर्वात कठीण सामना असेल. दक्षिण आफ्रिकेने 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते पण दोन वर्षांपूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Rishabh Pant Century: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऋषभ पंतची फटकेबाजी, शानदार शतकासह मोडला धोनीचा रेकॉर्ड

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -