सरन्यायाधीश पदासाठी उदय लळीत यांची नियुक्ती, २७ ऑगस्टला स्विकारणार पदभार

पुढील तीनच महिने ते सरन्यायाधीश पदी राहणार आहेत. ८ नोव्हेंबरला ते वयाचे ६५ वर्षे पूर्ण करत असल्याने तीन महिन्यातच ते निवृत्त होणार आहेत. उदय लळीत तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याजागी दुसरे न्यायमूर्ती विराजमान होतील. 

uday lalit

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती उदय लळीत यांची नियुक्ती करावी अशी शिफारस सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केली होती. हे शिफारस मान्य करण्यात आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदय लळीत यांच्या नियुक्तीचं पत्र सादर केलं आहे.  २७ ऑगस्ट रोजी ते सरन्यायाधीश पदाची जबाबादारी स्विकारणार आहेत. (Uday Lalit appointed as a chief justice of India)

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २७ ऑगस्ट रोजी संपणार आहे. याचदिवशी उदयल लळीत सरन्यायाधीश पदाची धुरा हाती घेणार आहेत. मात्र, पुढील तीनच महिने ते सरन्यायाधीश पदी राहणार आहेत. ८ नोव्हेंबरला ते वयाचे ६५ वर्षे पूर्ण करत असल्याने तीन महिन्यातच ते निवृत्त होणार आहेत. उदय लळीत तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याजागी दुसरे न्यायमूर्ती विराजमान होतील.

हेही वाचा – ४९ व्या सरन्यायाधीश पदासाठी सिंधुदुर्गच्या उदय लळीत यांच्या नावाची शिफारस

संविधानाच्या कलम १२४ च्या खंड (२) अनुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांचा २७ ऑगस्ट रोजी प्रभावी रुपाने नियुक्त करत आहे, असं राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या नियुक्तीपत्रात लिहिण्यात आलं आहे. न्यायमूर्ती उदय ललित हे या पदावर नियुक्त झालेले दुसरे व्यक्ती आहेत, ज्यांना थेट घटनापीठामधून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात बढती मिळाली आहे. तसेच, १९७१ मध्ये देशाचे १३ वे मुख्य न्यायाधीश बनले होते.

हेही वाचा – कोकणचो झिल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी, न्यायमूर्ती उदय लळीत पदभार स्वीकारणार

कोण आहेत उदय लळीत?

उदय लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचं मूळ घर आहे. वकिली व्यवसाय असलेल्या घरातच उदय लळीत यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील वकिली करायचे. एवढंच नव्हे तर त्याकाळी डॉक्टर बनलेल्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये त्यांच्या आजीचा समावेश होतो. त्या एलपीपीएस डॉक्टर होत्या. न्यायमूर्ती उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. त्यामुळे उदय लळीत यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईत झालं.

हेही वाचा – ओबीसी आरक्षणाला मंजुरी मिळण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका होणार आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

१९८३ पासून उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. काही वर्षे दिवंगत ज्येष्ठ वकील एम.ए.राणे यांच्याकडे काम केलं. त्यानंतर ते दिल्लीला गेले. ज्येष्ठ विधितज्ज्ञ सोली सोराबाजी यांचे ते सहा वर्षे निकटचे सहकारी होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे वकिलीही केली.