घरताज्या घडामोडीकोकणचो झिल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी, न्यायमूर्ती उदय लळीत पदभार स्वीकारणार

कोकणचो झिल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी, न्यायमूर्ती उदय लळीत पदभार स्वीकारणार

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ए.व्ही. रमना यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचं मूळ घर आहे. 

सिंधुदुर्गवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातील देवगड येथील उदय लळीत आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी ते भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारणार आहेत.

हेही वाचा – लढाई ऐन भरात असताना सैनिक सोबतीला आले, सुषमा अंधारेंचं उद्धव ठाकरेंकडून स्वागत

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ए.व्ही. रमना यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचं मूळ घर आहे.

वकिली व्यवसाय असलेल्या घरातच उदय लळीत यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील वकिली करायचे. एवढंच नव्हे तर त्याकाळी डॉक्टर बनलेल्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये त्यांच्या आजीचा समावेश होतो. त्या एलपीपीएस डॉक्टर होत्या. न्यायमूर्ती उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. त्यामुळे उदय लळीत यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईत झालं.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी आरक्षणाला मंजुरी मिळण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका होणार आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

१९८३ पासून उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. काही वर्षे दिवंगत ज्येष्ठ वकील एम.ए.राणे यांच्याकडे काम केलं. त्यानंतर ते दिल्लीला गेले. ज्येष्ठ विधितज्ज्ञ सोली सोराबाजी यांचे ते सहा वर्षे निकटचे सहकारी होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे वकिलीही केली.

२ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण हाताळले

उदय लळीत यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली आहे. मात्र, तरीही ते प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. २जी स्पेक्ट्रम हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार घोटाळा लळीत यांनीच चालवला होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -